राजीव गांधी विज्ञान-तंत्रज्ञान आयाेगाच्या मदतीने ग्रामीण भागातील तरुणांना आधुनिक विज्ञानाची ओळख करून देणाऱ्या सायन्स अँड इनाेव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटरचा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे उपयाेग हाेईल. या सेंटरमधून आगामी काळात नवीन संशाेधक तयार हाेऊन हा प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी ठरेल,’ अशा विश्वास उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री अजित पवार यांनी व्य्नत केला.बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट येथील सायन्स अँड इनाेव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटरअंतर्गत उभारण्यात आलेल्या टेक्नाॅलाॅजी डेमाेन्स्ट्रेशन लॅबच्या उद्घाटनप्रसंगी पवार बाेलत हाेते. बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ खासदार शरद पवार, आमदार रणजितसिंह माेहिते पाटील, चेअरमन राजेंद्र पवार, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयाेगाचे अध्यक्ष पद्मभूषण डाॅ. अनिल काकाेडकर, मानद सचिव नरेंद्र शाह, माजी सचिव डाॅ. अनिल मानेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, हाेमी भाभा सेंटर फाॅर सायन्स एज्युकेशनचे माजी ज्येष्ठ संशाेधन अधिकारी नरेंद्र देशमुख, नेहरू युवा केंद्राचे संचालक डाॅ. उमेश कुमार रस्ताेगी आदी यावेळी उपस्थित हाेते.
अजित पवार यांच्या पुढाकाराने बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेले सायन्स अँड इनाेव्हेशन अॅेक्टिव्हिटी सेंटर येथील टेक्नाॅलाॅजी डेमाेन्स्ट्रेशन लॅब एक पथदर्शी प्रकल्प आहे. याचधर्तीवर राज्यात इतर पाच ठिकाणी अशा प्रकारचे सेंटर उभारण्यात येणार असल्याचे डाॅ.काकाेडकर यांनी सांगितले. शरद पवार यांनीही यावेळी मनाेगत व्य्नत केले.टेक्नाॅलाॅजी डेमाेन्स्ट्रेशन प्राेजेक्टअंतर्गत उभारण्यात आलेल्या व्हर्चुअल रियालिटी, राेबाेटिक्स लॅब, सायन्स ऑन स्पिअर, हाेलाेग्राम टेक्नाॅलाॅजी आदी नाविन्यपूर्ण प्रकल्पांची पवार यांनी मान्यवरांसाेबत पाहणी करत माहिती घेतली. सेंटरच्या प्रमुख हीना भाटिया यांनी प्रकल्पांची माहिती दिली.यावेळी अंतराळ शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण; तसेच विद्यार्थ्यांच्या संशाेधन वृत्तीला चालना देण्यासाठी विद्यानिकेतन ट्रस्ट आणि कल्पना चावला स्पेस अकादमी (लाेणावळा) या संस्थेत सामंजस्य करार करण्यात आला. संशाेधनाच्या माध्यमातून पेटंट प्राप्त प्राध्यापक, विद्यार्थ्यांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला.