कामगार विभाग नव्या अभ्यासक्रमामुळे न्यायालयांवरील ताण कमी हाेईल : फुंडकर

    18-Jul-2025
Total Views |
 
 

worker 
 
कामगार विभागांतर्गत कार्यरत ना. मे. लाेखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था या राज्यातील एकमेव शैक्षणिक संस्थेमार्फत, उद्याेग व आस्थापनांतील अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी कायदेशीर चाैकट व शिस्तव्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमामुळे उद्याेग क्षेत्राला कायदेशीर बाबी आणि शिस्तव्यवस्थापनात निपुण मनुष्यबळ उपलब्ध हाेणार आहे.
परिणामी बहुतांश शिस्तभंग प्रकरणे आस्थापना स्तरावरच निकाली निघतील आणि न्यायालयांवरील ताण कमी हाेईल,असा विश्वास कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी व्यक्त केला.नरिमन भवन येथे ना. मे. लाेखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेद्वारे प्रस्तावित ‘सर्टिफिकेट काेर्स इन लीगल फ्रेमवर्क अँड डिसिप्लीन मॅनेजमेंट’ अभ्यासक्रमाचे उद्घाटन करताना फुंडकर बाेलत हाेते.
 
यावेळी कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, उपसचिव तथा संस्थेच्या संचालक राेशनी कदम-पाटील, उपसचिव दीपक पाेकळे, उपसचिव स्वप्निल कापडणीस, कार्यासन अधिकारी दीपाली जपे, संस्थेचे उपसंचालक डाॅ.अतुल नाैबदे उपस्थित हाेते.ही संस्था मुंबई व नागपुरात कार्यरत असून, श्रम विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी, पदविका व पीएचडी अभ्यासक्रम राबवते. नव्या शैक्षणिक धाेरणानुसार यापूर्वी चालू असलेल्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात सुधारणा करून त्याचे मानवी भांडवल व कर्मचारी व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी असे करण्यात आले आहे.मुंबई विद्यापीठ व नागपूर विद्यापीठाच्या मान्यतेने हा अभ्यासक्रम 2023-24 पासून सुरू झाला आहे, अशी माहिती कदम-पाटील यांनी दिली.