श्री साईबाबा संस्थानने तीन दिवसीय कालावधीत आयाेजिलेल्या श्री गुरुपाैर्णिमा उत्सवात साईबाबांच्या झाेळीत देणगी काऊंटर, ऑनलाइन, धनादेश, डीडी, मनिऑर्डर, डेबिट-क्रेडिट कार्ड, यूपीआय, साेने, चांदी, दर्शन व शुल्क आरती पास या सर्व मार्गांनी मिळून एकूण 6 काेटी 31 लाखांचे दान जमा झाल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गाेरक्ष गाडीलकर यांनी दिली.राेख देणगी स्वरुपात 1 काेटी 88 लाख, देणगी काऊंटरवर 1 काेटी 17 लाख, सशुल्क पास 55 लाख 88 हजार, डेबिट क्रेडिट कार्ड, ऑनलाइन देणगी, धनादेश, डीडी., मनीऑर्डर आदी एकूण 2 काेटी 5 लाख, साेने 668.400 ग्रॅम (किंमत 57 लाख 87 हजार) व चांदी 6798.680 ग्रॅम (5 लाख 85 हजार) यांचा समावेश आहे.