एक जिल्हा, एक उत्पादना’त महाराष्ट्राचा डंका

18 Jul 2025 14:13:30
 

Product 
 
‘एक जिल्हा एक उत्पादन 2024’ अंतर्गत महाराष्ट्राने चमकदार कामगिरी केली असून, राज्याला ‘अ’ श्रेणीतील सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. रत्नागिरी, नागपूर, अमरावती, नाशिक आणि अकाेला या जिल्ह्यांनी कृषी आणि अकृषक क्षेत्रातील विशिष्ट उत्पादनांसाठी सुवर्ण, राैप्य, कांस्य आणि विशेष उल्लेख पुरस्कार पटकावले आहेत.भारत मंडपममध्ये ‘एक जिल्हा, एक उत्पादन 2024 पुरस्कार’ साेहळ्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. केंद्रीय वाणिज्य व उद्याेग मंत्री पीयूष गाेयल, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि वाणिज्य व उद्याेग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थित पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्राने आपल्या उत्पादनांची नावीन्यपूर्णता, उच्च दर्जा आणि वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेने राष्ट्रीय स्तरावर वर्चस्व प्रस्थापित केले.
 
‘एक जिल्हा, एक उत्पादन’ उपक्रमांतर्गत पुरस्कारांत महाराष्ट्राने आपलीउत्कृष्टता सिद्ध करून विविध श्रेणींत पुरस्कार मिळवले. हे पुरस्कार जिल्हा, राज्य आणि परदेशातील भारतीय दूतावास या तीन गटांमध्ये देण्यात आले. परदेशातील भारतीय दूतावासांनी या समारंभात दूरदृश्य प्रणालीद्वारे भाग घेतला. राज्यांच्या ‘अ’ श्रेणीत महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, पंजाब आणि उत्तर प्रदेशनेही सुवर्णपदक मिळवले.राज्याच्या वतीने उद्याेग संचालनालयाचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंग कुशवाह यांनी हा पुरस्कार स्वीकारला.रत्नागिरीचा हापूस आंबा यंदाहअव्वल ठरला. कृषी क्षेत्रातील ‘अ’ श्रेणीअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याने प्रथम स्थान मिळवले. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम.देवेंद्र सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
 
नागपूरच्या संत्र्यांनी कृषी क्षेत्रातील ‘अ’ श्रेणीअंतर्गत द्वितीय स्थान प्राप्त केले असून, राैप्यपदकाचा पुरस्कार नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी स्वीकारला.अमरावतीने मंदारिन संत्र्यांसाठी कृषी क्षेत्रातील ‘अ’ श्रेणी अंतर्गत तृतीय स्थान मिळवले. अमरावती जिल्हा उद्याेग केंद्रांचे महाव्यवस्थापक नीलेश निकम यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नाशिक जिल्ह्याने द्राक्षे आणि मनुक्यांसाठी (ग्रेप्स अँड रेझिन्स) कृषी क्षेत्रातील श्रेणी ‘अ’ अंतर्गत विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळवला. हा पुरस्कार नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी स्वीकारला. अकाेला जिल्ह्याने अ-कृषी क्षेत्रातील ‘ब’ श्रेणी अंतर्गत कापूस जिनिंग आणि प्रेसिंगसाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार प्राप्त केला. हा पुरस्कार जिल्हा उद्याेग केंद्र, अकाेल्याचे महाव्यवस्थापक संताेष बनसाेड यांनी स्वीकारला.
Powered By Sangraha 9.0