निरा-देवघर प्रकल्पाचे कालवा आणि उपसा सिंचन प्रकल्पाचे काम वेगात सुरू असून, या प्रकल्पामुळे माळशिरस व फलटणसारख्या दुष्काळग्रस्त भागांना लवकरच सिंचनासाठी पाणी उपलब्ध हाेणार असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले. निरा-देवघर प्रकल्पातून सुरू हाेणाऱ्या कालव्याचे पहिल्या 65 कि.मी.चे काम पूर्ण झाले आहे.
साधारणपणे बंदिस्त जलवाहिनीद्वारे 100 कि.मी.चे काम करायचे असून, त्यापैकी 20 कि.मी.चे काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम सुरू आहे, असे विखे पाटील यांनी सांगितले. शंभर वर्षांपूर्वी बांधलेल्या निरा उजवा कालव्याची वहनक्षमता अपुरी ठरत असल्याने दाेन सिंचन आवर्तनांत अंतर वाढले आहे. मात्र, 2025 च्या उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या पिकांना धाेका झाल्याचे निदर्शनास आलेले नाही. निरा-देवघर आणि गुंजवणी प्रकल्पाचे कालवे कार्यान्वित हाेईपर्यंत त्यांच्या पाण्याचा लाभ निरा उजवा आणि डाव्या कालव्याला मिळत आहे. त्यामुळे निरा-देवघरचे पाणी थांबले, तरी मूळ लाभक्षेत्रावर फारसा परिणाम हाेणार नसल्याचे विखे पाटील यांनी सांगितल