खर्चिक जीवनशैलीतील बदल: आपल्या सगळ्यांना नवीन कपडे खरेदी करायला किंवा चमचमीत खायला, स्पाध्ये जायला आवडते. या सगळ्या गाेष्टी खर्चिक असतात. आपल्याला कपडे पुरेसे असणे आवश्यक असते.आता प्रत्येकासाठी पुरेसे कपडे ही व्याख्या वेगळी असते. त्यामुळे घरात किती कपडे असणे पुरेसे आहे हे आपण ठरवले पाहिजे.आपण हटके दिसलाे पाहिजे आणि कधीतरी स्वतःला खास वाटेल असे कपडे घातले पाहिजेत इतपत ठीक आहे.त्यापलीकडे खर्च वाढू देता कामा नये.मुळात आपण जी गाेष्ट खरेदी करणार आहे तिची आपल्याला खरच गरज आहे का हा निकष लावला पाहिजे.
हाॅटेलवरील खर्च: महिन्यातून हाॅटेलमध्ये किती वेळा जायचे आणि बाहेर किती वेळा खायचे याचा हिशेब ठेवला पाहिजे. आपण दाेन वेळा हाॅटेलमध्ये सहकुटुंब जेवण करून ालाे तर तेवढ्या खर्चात घरातील महिनाभराचा किराणा माल येत असताे.त्याचबराेबर किराणा माल खरेदी करताना देखील माॅलमध्ये दिसणारी प्रत्येक वस्तू खरेदी केली पाहिजे असे नव्हे. इथेही आपली गरज हा निकष लावणे याेग्य ठरते.अन्यथा सूट, डिस्काऊंट, ्री म्हणून आणलेल्या वस्तू घरात पडून राहतात आणि काही दिवसांनी खराब झाल्यावर न वापरताच ेकून द्याव्या लागतात. त्यामुळे हाॅटेलिंगवरील खर्च तसेच किराणा मालाच्या खरेदीवरील खर्चात निश्चितपणे भरपूर बचत करता येऊ शकते.
काैटुंबिक खर्च कमी करणे: सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्ही जाे काही खर्च कराल त्यासाठी क्रेडिट कार्ड वापरू नका. सगळी बिले वेळेत भरा.जेणेकरून दर महिन्याला प्रत्येक बिलाची तुलना करता येईल आणि बिल वाढले असल्यास तसे का घडले याचा शाेध घेता येईल.