कागंभीर प्रकरणांमध्ये अतिर्नित औषधे औषधेसुद्धा दिली जातात. त्यांच्यामुळे हाडांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढण्यात मदत मिळते.
ऱ्हूमॅटाॅयड ऑर्थाेरायटिस ऱ्हूमॅटाॅयड ऑर्थाेरायटिसच्या कारणाने सांध्यांच्या आजूबाजूला जास्त वेदना आणि सूज, सांधे आणि स्नायू कडक झाल्याची तक्रार असते. सकाळी उठल्यानंतर त्याचे गांभीर्य जास्त असते. हात आणि पंजांच्या सांध्यांमध्ये सूज हाेणे सामान्य गाेष्ट आहे.पण, या राेगाने प्रभावित पेशंटच्या काेणत्याही सांध्यांमध्ये हा आजार हाेऊ शकताे. सर्वसामान्यपणे 20 ते 30 वर्षांच्या वयातील लाेकांना हा राेग आपल्या तावडीत घेताे आणि पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये याची श्नयता 3 पट असते. जर या राेगाचा उपचार केला गेला नाही, तर हळूहळू शरीराच्या दुसऱ्या सांध्यांवर जसे काेपर, खांदे, गुडघे आणि कुल्हे यांच्यावर सुद्धा परिणाम हाेताे.
ऑस्टिओ ऑर्थाेरायटिस ऑर्थाेरायटिसच्या सर्वांत सामान्य रूपांमध्ये ऑस्टिओ ऑर्थाेरायटिस आहे. ज्याला ‘डीजेनेटिव्ह जाॅइंट डीसीज’ सुद्धा म्हटले जाते आणि ताे सर्वसाधारणपणे सांध्यांची झीज झाल्यामुळे निर्माण हाेताे. हा राेग युवकांच्या तुलनेत वृद्धांमध्ये जास्त आढळून येताे. ऑस्टिओ ऑर्थाेरायटिसच्या पेशंट्सना वजन नियंत्रित ठेवणे, फिजिओथेरपी आणि शारीरिक व्यायाम, याेग्य प्रकारच्या चपलांचा वापर, औषधे आणि अनेक वेळा गंभीर प्रकरणांमध्ये सांधा प्रत्याराेपणाचा सल्ला सुद्धा दिला जाताे.सांधा प्रत्याराेपणाचा सल्ला त्या पेशंटना दिला जाताे, जे सामान्यपणे गंभीर ऑर्थाेरायटिसची शिकार झालेले असतात.
आजकाल प्रगत स्वरूपाचे प्रत्याराेपणसुद्धा उपलब्ध आहे. त्याच्या मदतीने पेशंट वेगाने सामान्य जीवन जगू शकताे. नी रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये एक नवीन टे्ननाॅलाॅजी माेबाइल बिअरिंग नी आहे; आणि आतापर्यंत जगभरात 10 लाख अशा सर्जरी केल्या गेल्या आहेत; आणि मागील 18 महिन्यांतच अनेक पेशंटना अत्याधुनिक राेटेटिंग प्लॅटफाॅर्म हाय फ्ले्नसाॅन नी (आरपीएफ) लावण्यात आलेले आहे. असे माेठ्या संख्येने पेशंट एकट्या भारतातच आहेत. अशा गुडघ्यांना भारतीय पेशंटसाठी तयार करण्यात आले आहे. ते गुडघ्यांना वाकविणे आणि बसणे अशा दैनिक हालचाली करण्यात मदत करतात. आरपीएफ पेशंट या सर्जरीनंतर एकदा पुन्हा सामान्य वेदनाविरहीत जीवन जगू शकतात आणि त्या सर्व हालचालींमध्ये भाग घेऊ शकतात, ज्यांना ते पसंत करतात.