छुप्या कॅमेऱ्यांमुळे महिला असुरक्षित हाेत आहेत

    18-Jul-2025
Total Views |
 

camera 
 
राजकाेटमधील एका हाॅस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज आणि महाकुंभामध्ये स्नान करणाऱ्या महिलांचा व्हिडिओ हॅक करून ऑनलाइन अपलाेड झाल्याची घटना समाेर आली आणि खळबळ माजली. तसेच, शाॅपिंग काॅम्प्लेक्स, काॅलेज, रेस्टाॅरंटमधील स्वच्छतागृहे, कपड्याच्या दुकानातील चेंजिंग रूम, रेस्टरूममध्ये छुपे कॅमेरे बसविलेले सापडले आहेत. त्यामुळे साहजिकच महिलांमध्ये भीती निर्माण हाेत आहे. अस्वस्थता निर्माण हाेते.
 
सीसीटीव्ही गरजेचा पण धाेकादायकही
 
सध्या सुरक्षेच्या कारणामुळे सीसीटीव्ही मूलभूत गरज बनला आहे. घर, साेसायटी, ऑफिस,शाॅपिंग माॅल, स्कूल-काॅलेज, सरकारी कचेरी, सार्वजनिक स्थळे कुठेही जा, तुम्ही 24 तास काेणत्या ना काेणत्या कॅमेऱ्याच्या नजरेत असताच! विविध गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पाेलीस डिपार्टमेंट सीसीटीव्ही फुटेजचाच आधार घेत असते. पण, सुरक्षेसाठी बसवण्यात आलेली ही उपकरणे आता लाेकांची प्रायव्हसी भंग करत आहेत.
 
सीसीटीव्ही आणि हॅकिंग
 
सामान्यपणे 80 ते 90% लाेक सीसीटीव्ही कॅमेऱ्याची खरेदी करताना हाय सिक्युरिटी सिस्टीम कॅमेरे घेत नाहीत, तर कमी दर्जाचे सीसीटीव्ही बसवतात. पण, हे कॅमेरे थर्ड पार्टी अ‍ॅप, थर्ड पार्टी सर्व्हरशी जाेडलेले असू शकतात. ते सर्व्हर हाय सिक्युरिटी फीचर्सचे नसतात. त्यामुळे ते हॅक हाेण्याची शक्यता वाढते.त्यामुळे जास्त सुरक्षित असलेले सीसीटीव्ही कॅमेरे घ्यावेत.
 
पासवर्ड बदला
 
सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कंपनी एक डिफाॅल्ट पासवर्ड सेट करत असते. सीसीटीव्ही कॅमेरा बसविल्यावर ताे बदलणे गरजेचे असते. पण, अनेक लाेक मुळातील पासवर्ड बदलत नाहीत. हॅकर्स या गाेष्टीचा गैरफायदा घेतात. बरेच हॅकर्स पासवर्ड क्रॅकिंग टूल्सने पासवर्ड क्रॅक करतात आणि कॅमेऱ्यावर येणारी प्रत्येक गाेष्ट ते पाहू शकतात.
 
गुन्हेगार कॅमेरा फुटेज विकून कमाई करतात
 
हाॅटेलमधील रूम, बाथरूममध्ये अशाच प्रकारचे कॅमेरे लावण्यात आल्याची अनेक प्रकरणे उघडं झाली आहेत. सार्वजनिक स्वच्छतागृहे, हाॅटेल्स- माेटेल रूम्समध्ये लहान छिद्रे किंवा भिंतींच्या चिरांमध्ये ठिकठिकाणी लहान कॅमेरे लपवून ठेवलेले असतात. गुन्हेगार या कॅमेऱ्यांचे फुटेज ऑनलाइन विकून माेठी कमाई करतातछुपा कॅमेरा तंत्रज्ञानाचा खूप विकास झाला आहे. पण, त्याचा गैरवापर करणारेही वाढले आहेत. व्यक्तीच्या नकळत अगदी छाेट्या कॅमेऱ्यांनी शूटिंग केले जाते. अशा छुप्या कॅमेऱ्यांचा वापर गुप्तहेर करायचे. पण, आता गुन्हेगारही करू लागले आहेत.या कॅमेऱ्यामध्ये माेठा लाइट किंवा आवाज नसताे. एवढेच नाही, तर त्यांचा आकारही इतका लहान असताे, की ते सहजा सहजी दिसतही नाहीत.
 
छुप्या कॅमेऱ्यांमुळे सार्वजनिक स्वच्छतागृहांची वाढली भीती अनेक देशांतील महिला छुप्या कॅमेरा व सीसीटीव्ही फुटेज हॅकिंगमुळे त्रस्त झाल्या आहेत.दक्षिण काेरियात महिलांनी अशा प्रकारच्या घटनांविराेधात आवाज उठविला. परंतु त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जाते. या प्रकारच्या गुन्ह्यांमुळे महिला आणि युवती सार्वजनिक स्थळी बाथरूमला जाण्याचे टाळतात आणि आजाराच्या आहारी पडतात.छुपे कॅमेरे सापडल्याच्या घटना बंगळुरूमध्ये एका काॅलेज कर्मचाऱ्याने महिलांच्या वाॅशरूमच्या डस्टबिनमध्ये माेबाइल फाेन लपविला हाेता. हा फाेन फ्लाइट माेडमध्ये हाेता आणि व्हिडिओ रेकाॅर्डिंग चालू हाेते. त्याने डस्टबिनला लहान छिद्र पाडले हाेते, त्यामुळे महिलांचे फुटेज रेकाॅर्ड हाेऊ शकेल. दुसऱ्या एका काॅलेजमध्ये महिला रेस्टरूमच्या खिडकीतून व्हिडिओ रेकाॅर्ड करताना पकडला गेला हाेता. अशा अनेक घटना गेल्या काही वर्षांमध्ये घडल्याचे दिसून येते.
 
महिलांसाठी इमर्जन्सी किट काही देशांतील महिला आता स्वतःबराेबर इमर्जन्सी किट ठेवू लागल्या आहेत. यामध्ये स्क्रू ड्राइव्हर, मास्क, सिलिकाॅन सिलंट असते. लहान छिद्रांतील लपलेले कॅमेरे ताेडण्यासाठी स्क्रू ड्राइव्हर उपयाेगी पडताे. मास्कने स्वतःचा चेहरा लपवता येताे आणि सिलिकाॅन सिलंटने बाथरूमच्या भिंतीमधील चिरा भरता येतात.आपल्या देशातील स्थिती पाहता, लवकरच महिला अशा प्रकारची किट ठेवायला लागतील, असं दिसतंय! तेलंगणातील नॅशनल सर्व्हिस स्कीमच्या (एनएसएस) कार्यक्रमामध्ये छुप्या कॅमेऱ्यांना कसे शाेधावे याचे ट्रेनिंग विद्यार्थ्यांना देण्यात येते.