मासिक खर्चावर कसे नियंत्रण ठेवावे?

    17-Jul-2025
Total Views |
 

thoughts 
 
आपला मासिक खर्च कसा नियंत्रित ठेवावा याविषयी काही टिप्स येथे देत आहाेत.
 
 आपली मासिक बिलाची यादी बारकाईने तपासावी आणि आराेग्यदायी पदार्थांना प्राधान्य द्यावे. शक्य तेवढे जंक ूड यादीतून काढून टाकावेत.
 
 पॅकेटबंद वस्तूंचे वजन तपासावे. कदाचित एखाद्या विशिष्ट ब्रँडसारख्याच वस्तूची किंमत हुबेहूब समान दिसणाऱ्या त्याच्या प्रतिस्पर्धी कंपनीच्या वस्तूच्या किमतीपेक्षा कमी वा जास्त असेल.
 
 फक्त नुकत्याच पॅक केलेल्या वस्तूच खरेदी कराव्यात. तसेच नुकसान टाळण्यासाठी जास्त प्रमाणात पॅकबंद वस्तू खरेदी करू नयेत.
 
 फक्त भावनेच्या वा आवेगाच्या आहारी जाऊन ज्यावर दिला जाणारा डिस्काउंट आकर्षक असेल अशा काेणत्याही वस्तू खरेदी करू नये.आपल्याला गरज असलेल्या वस्तूच खरेदी कराव्यात.
 
 कमी चर्चित ब्रँड खरेदी करण्याचा प्रयत्न करावा. कारण त्यांची गुणवत्ता बॅ्रंडेड वस्तूच्या तुलनेत कमी असेलच असे नाही. कधी कधी माेठ्या ब्रँडच्या वस्तूंची किंमत जास्त असते कारण त्यांचा प्रचार जास्त असताे. ते जाहिरातींवर अधिक खर्च करीत असतात. ताे जाहिरातींचा खर्चही आपल्याकडूनच वसूल केला जाताे.
 
 आजच्या या स्पर्धेच्या काळात आपण नक्कीच किमतीची घासाघीस करायला हवी आणि रिटेलर्सवर कमी किमतीत वस्तू विकण्यासाठी दबाव टाकायला हवा.
 
 किमती कमी आणण्यासाठी सामूहिक रूपात वा ग्रूपमध्ये खरेदी करणेही उत्तम मानले जाते.