जरा डाेळे मिटा अन् अंतर्मनात डाेकावून पहा, खराेखरच चेतना म्हातारी झाली आहे का? जरेच्या सुरकुत्यांचे नावसुद्धा चेतनेपर्यंत पाेहाेचत नाही, जरेचा बाक चेतनेपर्यंत पाेहाेचतसुद्धा नाही. आपण बालक असताना चेतना जशी हाेती तशीच ती आतासुद्धा आहे. जन्म ताना ती जितकी ताजी हाेती तितकीच ताजी मरतानाही ती असेल.चेतना शिळी हाेतच नाही. पण शरीर मात्र शिळे हाेत जाते. शरीर जीर्ण-शीर्ण, जर्जर हाेत जाते आणि आपण मात्र चाेवीस तास शरीर म्हणजे मीच आहे, हाच भ्रम पुनरावृत्त करत राहताे. म्हणून माणूस रडताे की, ‘मी आता म्हातारा झालाे.’ चेतना कधी म्हातारी हाेत नसते.
समजा डाेळे जर सतत बंद ठेवले, वर्षभर नव्हे अगदी दहा वर्षेआपल्याला जेवण मिळत गेले तर शरीराला पत्ता लागू दिला नाही, आरशाशी आपला संबंध येऊ दिला नाही, तर दहा वर्षांनी आपण आपल्या अंत:स्थ चेतनेच्या अनुभवाने म्हणू शकाल. का की, ‘मी म्हातारा झालाे? आपण नाही म्हणू शकणार. कारण आपल्याला पत्ताच लागणार नाही. त्यामुळे कित्येकदा माेठ्या चुका हाेतात. काही खाेल क्षणी म्हातारेसुद्धा लहानग्या मुलासारखे वागू लागतात. त्याचे कारण हेच आहे. आतील चेतना तर कधी म्हातारी हाेत नाही.वरची शरीराकृती खाेळ फक्त म्हातारी हाेत असते.त्यामुळे कधी-कधी म्हातारी माणसेही तरुणांसारखेच वागून जातात. याचे हेच कारण आहे.