कुटुंबातील युवा पिढी पैशांच्या बाबतीत बेपर्वा आहे. दिलेले पैसे उडवून टाकतात. कधीही कागदावर स्वतःचे बजेट तयार करत नाहीत, अशी अनेक मध्यमवर्गीय पालकांची तक्रार असते. पण, तुम्ही तुमचे बजेट लिहून तयार करता का, असा प्रश्न विचारल्यावर, त्यांचे माेघम उत्तर असते, आम्हाला बजेट बनवण्याची गरजच पडत नाही. कारण, आम्ही अंथरुण पाहूनच पाय पसरताे! म्हणजे जेवढे पैसे मिळतात, त्याच्यापेक्षा जास्त खर्च करत नाही. म्हणजे बजेट केले नाही तरी चालते, असे त्यांना वाटते. हा बजेटबद्दल दृष्टिकाेन अव्यवहारी आहे, असेही त्यांना वाटत नाही.मुलांनाही बजेट शिकवत नाहीत यातील बहुतांश पालक मुलांनाही ते मागतील तसे पैसे देत राहतात. पालकांना वाटते, मुलांना काॅलेजला जायचे असते, मित्र-मैत्रिणींबराेबर बाहेर फिरायला जायचे असते... पैसे तर हवेच ना! आपले हे वागणे अव्यवहारी आहे, असे अनेक पालकांना वाटत नाही.
ते स्वतःसाठीही लिखित बजेट बनवत नाहीत आणि मुलांमध्येही सवय रुजवत नाहीत. पालक स्वतः भलेही आवकपेक्षा जास्त खर्च करत नसतील, पण मुले महिना पूर्ण हाेण्याआधीच सगळे पैसे उधळतात, तेव्हा त्यांना समजून-उमजून खर्च करायला शिकवण्याऐवजी जास्तीचा पाॅकेटमनी देतात आणि नंतरहून त्यांनाच प्रश्न पडताे, की मुले पैशांच्या बाबतीत एवढी बेपर्वा, बेजबाबदार कशी काय? पैसे गुंतविण्यात वाटते जाेखीम काही लाेकांना शेअर बाजारात पैसे गुंतवायला माेठी जाेखीम वाटते. शेअर बाजारात, अर्थातच, नफा आणि ताेटा, दाेन्हींची शक्यता असते. पण, शिकल्यावर, समजून घेतल्यावर शेअर बाजार कळू शकताे. पण, पैसे वाढवण्यासाठी लाेक प्रयत्न करायला तयार हाेत नाहीत.
हीच माणसे कारमध्ये ड्रायव्हरच्या शेजारी बसल्यावर सीट बेल्ट लावत नाहीत. त्यांना जणू वाटतं, की अपघात झाल्यावर एकट्या ड्रायव्हरलाच इजा हाेईल. अनेक जण चेन स्माेकर असतात. पण या लाेकांना शेअर बाजारात पैसे गुंतवायला जाेखीम वाटते.सगळ्यात जाेखीम कशात आहे? सीट-बेल्ट न वापरणे, सतत सिगारेट ओढणे की शेअर बाजारात गुंतवणूक करणे? शेअर बाजारात, नफा हाेण्याची एक शक्यता तरी असते, पण सतत सिगारेट ओढल्याने केवळ नुकसानच हाेणार असते!पैसा बँकेत पडून राहताे अनेक लाेक पै पै वाचवतात. कधी हाॅटेलमध्ये जेवायला गेलेच तर, परत परत बिल तपासतात. पदार्थांची किंमत बराेबर लावली आहे किंवा नाही हे मेनूमध्ये पाहून चेक करतात.
कारण, त्यांना त्यांच्या प्रत्येक पैशाची कदर असते. पण, हेच लाेक माेठी रक्कम बँकेत तशीच ठेवतात. तिथे ती अगदी निष्क्रिय पडून आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. कारण, पैसा याेग्य ठिकाणी गुंतवल्यावर वाढताे, याविषयी त्यांना माहिती नसते किंवा त्याची भीती असते.पैशाचे नियाेजन डाे्नयाने करणे गरजेचे आपण स्वतःच्या आणि जवळच्या नातेवाइकांच्या वर्तनात-व्यवहारात अशा प्रकारचा अव्यवहारीपणा पाहत असताे. कारण आपण पैशांच्या बाबतीत बुद्धिपूर्वक वागत नसताे, तर मनाने प्रतिक्रिया देताे.पैशांच्या बाबतीत आपण जबाबदार आणि तर्कशुद्ध आहाेत, असे अनेकांना वाटते. ते तसा देखावाही करतात. पण, प्रत्यक्ष परिस्थिती तशी नसते, हे अनेकांच्या बाबतीत दिसते.