इंटरव्ह्यूत हवे बाॅडी लँग्वेजकडे लक्ष

16 Jul 2025 14:33:02
 
 

thoughts 
प्रवेश करताना : इंटरव्ह्यू हाॅलमध्ये प्रवेश करतानाच आपली परीक्षा सुरू हाेते. हाॅलमध्ये जाताना आपल्या चेहऱ्यावर स्मित आणि आत्मविश्वास झळकायला हवा.जाताच खुर्चीत बसण्याऐवजी समाेरच्याच्या खुणेची वाट पाहावी. जर टेबलाभाेवती अनेक खुर्च्या असतील तर आपल्या समाेर बसलेल्या व्यक्तींना आपल्याशी बाेलताना कमीतकमी वळावे लागेल अशी जागा निवडावी.
 
अनावश्यक हालचाली टाळाव्यात : इंटरव्ह्यूदरम्यान आपले विचार मांडताना वा उत्तरे देताना हात खूप जादा हलवत बाेलू नये. हात हलवत बाेलण्याची आपल्याला सवयच असेल तर हात छातीपेक्षा वर येणार नाही याची दक्षता घ्यावी, कारण त्यामुळे आपले आचरण आक्रमक वाटू शकते. काहींना टेबलावरील पेन वा एखादी वस्तू घेऊन त्याच्याशी खेळण्याची सवय असते. असे इंटरव्ह्यूत करू नये. कारण यामुळे आपल्या एकाग्रतेविषयी शंका उत्पन्न हाेते.
 
बसण्याची याेग्य पद्धत : बसताना आपला पाॅश्चर पाहा.आपल्या शरीरमुद्रेत आत्मविश्वास व नम्रता दाेहाेंचे संतुलन दिसावे. दाेन्ही पाय जमिनीवर टेकवून सरळ बसावे. समाेर टेबल असेल तर त्यावर हात टेकवू शकता अन्यथा दाेन्ही हात आपल्या मांडीवर ठेवावेत. ताठ बसण्याऐवजी थाेडे पुढे झुकावे.
 
सहज राहावे : परीक्षकांच्या समाेर बसणे म्हणजे आपले लक्ष प्रश्नांच्या उत्तरांऐवजी स्वत:वरच असावे असे नव्हे. आपण ज्या मुद्रेत बसाल त्यात आरामात राहावे. खूप आखडून वा झुकून बसल्यामुळेही आपले व्यक्तिमत्त्व दबके वाटते. जरी मनातून आपण घाबरलेले असाल तरी ते इंटरव्ह्यूअरला कळू देऊ नये.
 
Powered By Sangraha 9.0