नासाच्या साेलार प्राेबने तप्त ज्वाळांचा स्फाेट टिपला

16 Jul 2025 14:25:41
 

Nasa 
 
सूर्यावरील घडामाेडी आणि हाेणारे साैरस्फाेट यांच्यामुळे हाेणाऱ्या संभाव्य स्फाेट आणि विध्वंसाचं परीक्षण संशाेधकांकडून सुरू असतानाच अमेरिकी अंतराळ संशाेधन संस्था नासाने पुन्हा एक कमाल केली आहे. सूर्याचं अतिप्रचंड उष्ण तापमान आणि त्यामुळं उद्भवणारी एकंदर परिस्थिती पाहता नासाच्या पार्कर साेलार प्राेबनं एक अविश्वसनीय कामगिरी केली आहे.जिथं नासाच्या साेलार प्राेबनं सूर्याभाेवती परिक्रमण करत त्याची अशी काही छाया टिपली, जी आतापर्यंत काेणीच कधीही पाहिली नव्हती.नासानं जारी केलेल्या या व्हिडिओमध्ये सूर्याच्या तप्त ज्वाळांचा हाेणारा स्फाेट आणि त्यांची दाहकता पाहून धडकी भरत आहे. 24 डिसेंबर 2024ला पार्कर साेलार प्राेबनं आतापर्यंत सूर्याच्या अतिशय जवळ जाण्यासाठीचं उड्डाण भरलं. त्यावर असणाऱ्या ऑनबाेर्ड कॅमेरा सिस्टीमने सूर्याच्या धगधगत्या काेराेना मास इजेक्शन चे काही क्षण टिपले आणि संपूर्ण जगासह संशाेधक वर्गालाही थक्क केलं.
Powered By Sangraha 9.0