कांदा : 1. राेग प्रतिकारकशक्ती वाढते - कांदा शरीरात राेगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करताे.यामध्ये फाॅस्फरस, मॅग्नेशियम, पाेटॅशियम आणि व्हिटॅमिन-सी असे अनेक गुण असतात, जे शरीराला निराेगी बनवण्यास तसेच इम्युनिटी वाढविण्यास मदत करतात.पचनाच्या समस्यांवर कांद्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते. पचनक्रिया मजबूत करण्यासाठी आणि पाेट निराेगी ठेवण्यासाठी तुम्ही कांदा सलादच्या स्वरूपात खाऊ शकता.
2. कॅन्सरपासून हाेईल बचाव - कांद्यामध्ये अँटी कॅन्सर गुण देखील असतात. ते शरीरात कर्कराेगाच्या पेशी वाढण्यापासून राेखत नाहीत तर त्यांचा नाशही करतात. अनेक अभ्यासांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, जे कांदा खातात त्यांना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धाेका कमी असताे.
3. हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात - जर एखाद्याला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर त्याने कच्चा कांदा खाल्ला पाहिजे. हृदयाशी संबंधित आजारांमध्येही कांद्याचे सेवन फायदेशीर ठरते. यामुळे हार्ट अटॅकचा धाेका बऱ्याच प्रमाणात कमी हाेताे.
4. लाेहाची कमतरता भरून निघेल - कांद्याला लाेह, फाेलेट आणि पाेटॅशियमचा उत्कृष्ट स्राेत मानला जाताे. कांदा खाल्ल्याने शरीरातील लाेहाची कमतरता दूर केली जाऊ शकते. कांद्यामध्ये अँटी एलर्जिक, अँटी ऑक्सिडेंट सारखे गुण असतात, जे शरीराचे अनेक प्रकारच्या इंफेक्शपासून संरक्षण करण्यास मदत करते.