जगातील पहिले आश्चर्य ‘ताजमहाल

    15-Jul-2025
Total Views |
 
 

taj 
जागतिक सात आश्चर्याच्या यादीत ताजमहाल पहिल्या क्रमांकावर आहे. हा ताजमहल केव्हा बांधला? कसा बांधला याबद्दल थाेड्नयात माहिती. आग्रा शहराच्या सीमेशी यमुना नदीच्या दक्षिण किनाऱ्याला असलेला ताजमहाल माेगल बादशहा शहाजहानने आपली पत्नी मुमताज हिच्या स्मरणार्थ बांधला. भारत-इराण-मध्य आशिया अशा विविध प्रदेशांतील वास्तुशास्त्रज्ञांच्या समितीने तयार केलेल्या आराखड्यानुसार ताजमहाल बांधकामास इ.स. 1632 साली सुरुवात झाली.याचा प्रमुख वास्तुतज्ञ म्हणून उस्ताद इसा या तत्कालीन प्रसिद्ध इस्लामिक वास्तुतज्ञाची नेमणूक करण्यात आली हाेती. सुमारे वीस हजार मजुरांनी 22 वर्षांत या भव्य वास्तूची उभारणी करून भारताच्या साैंदर्यात भर घातली. मात्र अशा पद्धतीची दुसरी वास्तू परत उभी राहू नये म्हणून बादशहा शहाजहानने वास्तूच्या मुख्य कारागिराची दाेन्ही हाताची बाेटे छाटली हाेती