मासिक पाळीत अशी काळजी घ्या

    15-Jul-2025
Total Views |
 

periods 
 
स्वच्छतेची गरज पाळीच्या काळात खालिल गाेष्टींचे पालन केल्यास संसर्गाचा धाेका टाळता येताे : दर 4-6 तासांनी सॅनिटरी नॅपकिन, कप किंवा टॅम्पून बदलणे आवश्यक आहे. वापरलेले नॅपकिन याेग्य पद्धतीने टाकणे व हात स्वच्छ धुणे. याेनीचा भाग फक्त पाण्याने किंवा साैम्य साबणाने स्वच्छ करणे. तीव्र रसायने वापरणे टाळावे. घट्ट कपडे किंवा सिंथेटिक अंडरवेअर टाळावेत. सूती व सैलसर कपडे वापरावेत.
 
आहाराचे महत्त्व : पाळीच्या काळात शरीर रक्त गमावते आणि थकवा जाणवताे. त्यामुळे पाेषक आहार गरजेचा असताे.
 
लाेहयुक्त अन्न : पालक, चवळी, सफरचंद, खजूर, रागी, बीट यांचा समावेश करा.
 
कॅल्शियम आणि प्रथिने : दूध, दही, अंडी,डाळी, बदाम इ. पाणी भरपूर प्यावे शरीर डिहायड्रेट हाेऊ नये यासाठी.ताजे फळे आणि भाज्या पचन सुधारते आणि शरीराला ऊर्जा मिळते.मानसिक आणि भावनिक समताेल पाळीच्या काळात मूड स्विंग, चिडचिड, नैराश्य किंवा थकवा जाणवणे हे सामान्य आहे.
 
यावर पुढील उपाय उपयुक्त ठरतात : याेग आणि ध्यान : हलकी याेगासने आणि श्वसनाचे व्यायाम मानसिक शांतता देतात.
 
चांगला संवाद : आपली भावना कुटुंबीयांशी माेकळेपणाने व्यक्त करा.
 
विश्रांती : पुरेशी झाेप आणि आराम आवश्यक आहे.डाॅक्टरांचा सल्ला केव्हा घ्यावा? अतिप्रमाणात रक्तस्त्राव हाेणे,पाळी खूप अनियमित असणे, तीव्र पाेटदुखी किंवा थकवा, दुर्गंधीयुक्त स्त्राव अशा लक्षणांवर दुर्लक्ष न करता त्वरीत स्त्रीराेगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. पाळी ही काेणताही संकाेच न करता स्वीकारण्यासारखी नैसर्गिक प्रक्रिया आहे. याेग्य स्वच्छता, पाेषण, मानसिक स्वास्थ्य आणि सामाजिक समज वाढवणे हे महिलांच्या आराेग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.आपण एक समाज म्हणून जेव्हा या विषयावर खुलेपणाने बाेलू, तेव्हाच महिलांना खऱ्या अर्थाने समर्थ आणि सशक्त बनवू शकताे.