पसारा कमी करा, विभागणी करा : एक टाईमटेबल बनवा आणि त्यानुसार स्वच्छतेच्या कामांची यादी बनवा. एका वेळी घरातील एक भाग स्वच्छ करणे अधिक साेपे हाेईल. वेळेचीही विभागणी करा. पंखे, छत,भिंती मग फनचर आणि शेवटी फरशी अशी विभागणी करून साफसफाई करा. पसारा कमी करण्यासाठी नकाे असलेल्या गाेष्टी टाकून द्या. विशेषत: काेपरे, कप्पे आणि बाथरूममध्ये कमीत कमी सामान ठेवा.
साफसफाईसाठी आधुनिक उपकरणांचा वापर : या बाबतीत आधुनिक पद्धतीचे स्प्रे माॅप्स कामी येतात. बाजारात काही टू-इन-वन माॅप उपलब्ध आहेत. यामुळे काेरडी धूळ आणि ओला पृष्ठभाग एका फटक्यात स्वच्छ हाेतात.वाकून, अवघडलेल्या स्थितीत पुसण्यापासून मुक्ती मिळते आणि हे कामही मजेचे वाटू लागते.घरातील कामे अधिक साेपी आणि विनाकटकटीची व्हावीत यासाठी अनेक यांत्रिक पर्याय उपलब्ध आहेत. आजही अनेक स्त्रिया स्वत:च सगळी कामे करण्याचा अट्टहास धरतात आणि त्यातून चाळिशीच्या पुढील 70 टक्के भारतीय स्त्रियांना खांदा आणि पाठदुखीचा त्रास उद्भवताे, असे डाॅक्टरांचे म्हणणे आहे.
घरातील महत्त्वाच्या जागांचा प्राधान्यक्रम ठरवा : घरातील दुर्लक्षित भागांच्या स्वच्छतेसाठी अधिक वेळ द्या. विशेषत: दिवाणखाना आणि बेडरूम्समधील काेनाडयांकडे लक्ष द्या.दिवाणखाना आणि स्वयंपाकघराकडेही नीट लक्ष द्या. पाहुण्यांचा वावर याच ठिकाणी अधिक असताे. व्हॅक्यूम क्लीनर हलके आणि कुठेही नेता येण्यासारखे असतात. त्यामुळे किचकट काेपऱ्यांची स्वच्छता करणेही साेपे हाेते.आधुनिक मार्गांचा नक्की अवलंब करा : नेहमीच्या पद्धतीने केरकचरा काढणे, फरशी पुसणे याला सगळ्यांचीच मान्यता असते. काेपऱ्यांच्या साफसफाईचा वेळ कमी करणारी अनेक साेईस्कर आणि अधिक परिणामकारक साधने उपलब्ध आहेत. बाजारात उपलब्ध असलेले ट्रिपल आय टेक्नाॅलाॅजीचे व्हॅक्यूम क्लीनर्स फारच उततम आहेत. यामुळे साफसफाईचे काम साेपे, कमी वेळात हाेते. या उपकरणांमधून बाहेर पडणाऱ्या निगेटिव्ह आयओन्समुळे धूळ, धूर, बुरशीसारखे हवेतील सूक्ष्म कण निकामी हाेतात.
कपाटे, खिडक्या, आरसे, विद्युत उपकरणे आणि इतर छाेटया काेपऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका : कपाटातील नकाे असलेल्या वस्तू टाकून द्या. सणांच्या निमित्ताने आरसे आणि खिडक्यांकडे लक्ष देण्याचीही चांगली संधी मिळते. काही छाेटेमाेठे बदलही करता येतील.शाेभेचे लॅम्प्स, दिव्यांची आवरणेही पुसून घ्या.त्यामुळे घरात अधिक उजेड पडेल. अत्याधुनिक स्प्रे माॅप्स बहुपयाेगी असल्याने हे काम अतिशय साेपे हाेते.