नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वांत जलद बॅग क्लेम सिस्टीम विकसित करावी. हे या विमानतळावरील प्रमुख वैशिष्ट्य असावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली. सध्या या विमानतळाचे 94 ट्नके काम पूर्ण झाले असून, उर्वरित सहा ट्नके काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून सप्टेंबरमध्येच पहिले प्रवासी विमान टेक ऑफ करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.नवी मुंबई विमानतळाच्या प्रगतिपथावरील कामांची पाहणी करताना मुख्यमंत्री बाेलत हाेते.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, मंदा म्हात्रे, सिडकाेचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, विभागीय आयु्नत विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी किसन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भाेसले, सिडकाेचे सह-व्यवस्थापकीय संचालक शंतनू गाेयल, राजा दयानिधी, गणेश देशमुख, मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, गीता पिलाई, नवी मुंबई महापालिकेचे आयु्नत कैलास शिंदे, नवी मुंबईचे पाेलीस आयु्नत मिलिंद भारंबे, सह-आयु्नत संजयसिंह येनपुरे, उपायु्नत रश्मी नांदेडकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित हाेते.
या विमानतळाची 1 आणि 2 टप्प्यात 20 दशलक्ष प्रवासी आणि 0.8दशलक्ष टन मालवाहतुकीची क्षमता आहे. हे विमानतळ सप्टेंबरमध्ये कार्यान्वित हाेण्यासाठी सज्ज हाेत आहे. उर्वरित काम पूर्ण हाेण्यासाठी अधिक कर्मचाऱ्यांची नियु्नती करावी आणि काेणत्याही स्थितीत सप्टेंबरपूर्वी काम पूर्ण करावे, अशा सूचना सर्व यंत्रणांना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.