हरिद्वारमधील पिलभीत हाऊस परिसरामध्ये या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात काेणत्याही दिवशी राहण्याचे बुकिंग करण्यासाठी 30,000 रुपयांपेक्षा जास्त खर्च येईल,’ असे हाॅटेल मॅनेजर विकास नागर यांनी सांगितले. ‘या मालमत्तेत, काही दिवसांत माेठ्या संख्येने वाढलेली आणि तातडीची बुकिंग झाली आहेत. चांगले रस्ते, पायाभूत सुविधांमुळे अधिक पर्यटक हरिद्वारला स्वतः गाडी चालवत जाता येण्यासारखे पर्यटन स्थळ म्हणून निवडत आहेत.’ मेकमायट्रीपचे राजेश मागाेव सांगतात, ‘राेड-बेस्ड लेजर ट्रॅव्हल, म्हणजेच रस्त्याने प्रवास करण्याच्या पर्यायामध्ये वाढ झाली आहे. जयपूर आणि आग्रा, दिल्लीहून प्रवास करणाऱ्यांना आकर्षित करतात कारण रस्ते संपर्क आता वर्षागणिक सुधारत आहे.
‘त्याचप्रमाणे, बंगळुरूहून प्रवास करणाऱ्यांसाठी म्हैसूर ही पसंती असली, तरी कूर्ग, वायनाड आणि काबिनीसारखी ठिकाणे आता अधिक जवळ वाटत आहेत. रस्ते सुधारले आहेत आणि त्यामुळे प्रवासाचा कालावधी कमी झाला आहे. मुंबईहून नागपूरचा प्रवासही आता साेपा झाला असून, नाशिक आणि विदर्भाकडे जाणाऱ्या ट्रिप माेठ्या प्रमाणात वाढल्या आहेत,’ असे रॅडिसन हाॅटेल ग्रुपकडून सांगण्यात आले.रॅडिसन हाॅटेल ग्रुपचे निखिल शर्मा म्हणतात, ‘सिमला, लाेणावळा, मसुरी आणि सपुतारा यांसारख्या ठिकाणी ड्रायव्ह करून जाता येईल अशा हाॅटेलमध्ये बुकिंग सातत्याने वाढत आहे.’ अधिकाधिक भारतीय देशांतर्गत तर स्वतःच्या गाडीने जाण्यास उत्सुक आहेतच आता ते परदेशातही स्वतः गाडी चालवत पर्यटन करायला उत्सुक आहेत. थाॅमस कुकचे प्रमुख राेमिल पंथ यांनी सांगितले, ‘ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि ब्रिटन ही ठिकाणे निसर्ग साैंदर्यासाठी प्रसिद्ध आहेतच.