तरुणसागरजी

14 Jul 2025 14:51:22
 
 

tarun 
लहान मूल ते केवळ आपल्या आईवरच प्रेम करत असतं. मात्र, थाेडासा माेठा हाेताच आईला विसरू लागताे. कारण त्याला आता खेळणी आवडू लागतात.शाळेत जाताच पुस्तकांवर प्रेम करताे. काॅलेजात गेल्यावर डिग्री मिळवताे आणि नाेकरीवर प्रेम करू लागताे. मग, लग्न हाेताच बायकाेच्या प्रेमात पडताे. बायकाेची बाजू घेऊन, आईला उलटसुलट बाेलू लागताे. म्हातारपणी, सर्व साथ साेडून जातात, तेव्हा कुठे देवावर प्रेम करू लागताे.
Powered By Sangraha 9.0