शाळा अनुदानित असाे वा विनाअनुदानित, सरकारी असाे वा खासगी, तेथे मराठी विषय शिकवलाच गेला पाहिजे. प्रत्येक शाळेत मराठी भाषा बंधनकारक आहे.प्रत्येक शाळेत त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. शाळा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले. बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयात शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. बैठकीत मुंबई महापालिका आयु्नत भूषण गगराणी, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देओल, अतिर्नित पालिका आयु्नत डाॅ. अमित सैनी, उपायु्नत डाॅ. प्राची जांभेकर, शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ आदींसह शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित हाेते.
शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढला असला, तरी विद्यार्थ्यांची मातीशी असलेली नाळ तुटणार नाही, यावरही लक्ष देणे गरजेचे आहे; तसेच शाळांमध्ये दरवर्षी स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा आयाेजित करा. आठवीनंतरच्या विद्यार्थिनींसाठी शाळांमध्ये पिंक रूम तयार करा. यापुढे मुलांना शालेय जीवनापासूनच सैनिकी प्रशिक्षण देण्याबाबत विचार सुरू असून, लवकरच त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल. शिक्षक समायाेजनाबाबत आठ दिवसांत अहवाल सादर करून शिक्षकांचे समायाेजन करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. विविध याेजनांचा त्यांनी आढावा घेतला. मुंबई महापालिकेच्या याेजनांची डाॅ. जांभेकर यांनी माहिती दिली.