आपल्या आयुष्यात येणार नाहीत.त्यासाठी या शरीराच्या पलिकडे जाऊन जीवनात काही चांगल्या गाेष्टी केल्या पाहिजेत. ते म्हणजे तुमच्यातील अध्यात्मिक काेपरा. ज्यांना वृद्धत्व म्हणजे केवळ थकलेले शरीर माहित असते त्यांना वाढते वय हे भितीदायक आणि गूढ वाटू लागते. जेव्हा शरीर काही इशारे देऊ लागते आणि काही घडते तेव्हा त्यांना सगळेच अर्थहीन वाटू लागते. परंतु केवळ शरीराचा विचार न करता तुम्ही सामाजिक काम, मैत्री, लिखाण, वाचन, छंद, मुलांना शिकवणे अशा गाेष्टींमध्ये स्वतःला गुंतवून घेतले की वाढते वयाची काळजी न वाटता नवा उत्साह आणि चैतन्याचा संचार हाेऊ लागताे. नानाविध छंद, उपक्रमात स्वतःला गुंतवून घेतल्याने आणि त्याला अध्यात्मिकतेची जाेड दिल्यास आयुष्यात एकाकीपणा कधीच जाणवत नाही. तेव्हा कसे जगायचे आणि वाढत्या वयातील कंटाळा दूर झटकून उत्साह आणि चैतन्याची अनुभूती कशी घ्यायची हे तुम्हीच ठरवायचे आहे.
काहीजणांच्या बाबतीत तर त्यांना नाेकरी करताना जी गुणवत्ता, क्षमता दाखवता आलेली नसते ती क्षमता आता ते वेगळ्या क्षेत्रात भरारी मारून दाखवत असतात.काहीजणांच्या बाबतीत मात्र वेगळे घडते.निवृत्त झाल्यावर त्यांचे लक्ष आर्थिक बाबींपेक्षा आणि भाैतिक जगापेक्षा अध्यात्मिकतेकडे त्यांचा ओढा वाढताे. आपले शरीर हे मर्त्य आहे आणि एक दिवस आपल्याला ते साेडावेच लागणार आहे, हे खरे असले तरी आहे ताेपर्यंत या नाजूक शरीराची सर्वताेपरी काळजी घेणे आवश्यक असते. एखाद्या दिवशीकाही तरी घडते आणि शरीराला काही तरी हाेते. मग आपले जगण्याचे सगळेच संदर्भच बदलून जातात.हे कुणाबाबत घडू नये पण, ही शक्यता असते हे लक्षात घेतले पाहिजे. अनेकांना अशा प्रसंगांमधून जावे लागते. सगळ्यात चांगलेकाय तर असे हाेण्याची शक्यता लक्षात घेऊन काळजी म्हणून काही सकारात्मक गाेष्टींचा दिनक्रमात समावेश केला पाहिजे. जेणेकरून असे प्रसंग