पावसाळ्याच्या माैसमाला आजारांचा माैसम म्हटले जाते. या हवामानात डेंग्यू आणि चिकनगुनिया असे प्राणघातक आजार हाेऊ शकतात. अशा स्थितीत या आजारांपासून बचाव करण्यासाठी उपयाेगी जडी-बूटींविषयी माहिती असणे आवश्यक आहे.
गुळवेल : गुळवेल भारतात माेठ्या प्रमाणात आढळणारी औषधी आहे. या औषधीला सामान्यपणे डेंग्यू आणि चिकनगुनिया तापावर घेण्यास सांगितले जाते. गुळवेल संसर्गाचा सामना करण्यासाठी शरीराची राेगप्रतिकार श्नती आणि चयापचय (मेटाबाॅलिज्म) क्षमतेला वाढविते. गुळवेलीची पाने किंवा मुळांना उकळून आणि गाळून घेतल्याने तयार झालेला काढा सांधेदुखी आणि अस्थिबंधनाच्या वेदनांमध्ये त्वरित आराम देताे. गुळवेल डेंग्यूने पीडित राेग्यांच्या प्लेटलेट वाढविण्यासाठी सुद्धा मदत करते. तसेच चिकनगुनियाच्या राेग्यांना वेदनांपासून आराम देते.
पपईची पाने पपईची पाने डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या भीतीला जवळपास समाप्त करण्याचा एक परिणामकारक उपचार आहेत. डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या तावडीत सापडलेल्या पेशंटमध्ये सातत्याने कमी हाेणारी प्लेटलेट संख्या ही माेठी समस्या असते. संपूर्ण जगात केल्या गेलेल्या अनेक शाेधांनी हे स्पष्ट झाले आहे की, पपईच्या काेवळ्या पानांच्या रसाचे काही काळपर्यंत सतत सेवन केल्यास प्लेटलेट्सची संख्या वाढविण्यासाठी ते खूप परिणामकारक ठरते त्यांच्यात फायदेशीर एंझाइम असतात. हे एंझाइम केवळ प्लेटलेटची संख्याच याेग्य करतात असे नाही, तर डेंग्यूमुळे लिव्हरला झालेल्या नुकसानावरही इलाज करतात.
मेथीची पाने : लाेह, मँगनीज, काॅपर, मॅग्नीशियम आणि फाॅस्फाेरस अशा श्नतीशाली पाेषक घटकांनी परिपूर्ण मेथीची पाने, जीवनासाठी धाेकादायक डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या पेशंटनाआराम देण्यासाठी ओळखली जातात. तुम्ही रात्रभर पाण्यात मेथी भिजवून ठेवा. सकाळी त्या पाण्याचे सेवन करू शकता. किंवा साध्या पाण्यात मेथीची पावडर मिसळून घेऊ शकता. त्यामुळे शरीरातील वेदना आणि व्हायरल संक्रमणापासून सुटका हाेते.
पाणी : साधे पाणी पिल्याने ते प्लेटलेट निर्मिती प्रक्रियेला उत्तेजन देण्यास अतिशय सहाय्यक ठरते. म्हणून असा सल्ला दिला जाताे की, प्लेटलेट निर्मिती प्रक्रियेसाठी दरराेज पुरेसे पाणी प्या.पाण्याचे प्रमाण तीन ते पाच लिटरच्या मध्ये अवश्य असावे.
कडुलिंब : कडुलिंब एक उत्कृष्ट आयुर्वेदिक औषधी आहे.तिचा उपयाेग प्राचीन काळा पासून औषधाच्या रूपात केला जात आहे. याच्या काढ्याचे सेवन केले किंवा शरीरावर डासविराेधक म्हणून लावले तरीही ते अतिशय लाभदायक आहे. हे डेंग्यू आणि चिकनगुनिया पासून आराम देण्यात सहाय्यक ठरते. काढ्याचे सतत सेवन केल्याने केवळ प्लेटलेटची संख्या वाढते असे नाही, तर पांढऱ्या पेशींमध्येही वाढ हाेते. हे डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या पेशंटसाठी खूप फायदेशीर ठरते.
व्हिटॅमिन सी : व्हिटॅमिन सीच्या सेवनाने प्लेटलेटची संख्या वाढविता येऊ शकते. डेंग्यू पीडितांच्या प्लेटलेट वाढविण्यासाठी संत्रे, कीवी, लिंबू, ब्राेकाेली, इत्यादी खाण्याचा सल्लाह दिला जाताे. त्यांचा जूस पिणे सुद्धा खूप साेपे आणि उपयाेगी असते.