वसई-विरार महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशाेत्सव साजरा करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. जास्तीत जास्त शाडूच्या मूर्ती बनवण्यासाठी प्राेत्साहन मिळावे यासाठी पालिकेमार्फत मूर्तिकारांना शाडूची माती उपलब्ध करून दिली जाणार आहे. या वर्षी महापालिकेने 1 हजार गाेणी शाडू माती मागवली असून, ती मूर्तिकारांच्या मागणीनुसार माेफत वितरित केली जाईल. वसई-विरार शहरात दरवर्षी माेठ्या उत्साहात गणेशाेत्सव साजरा केला जाताे. मागील काही वर्षांपासून घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या वाढली आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे जलस्राेत प्रदूषित हाेऊन पर्यावरणाला धाेका निर्माण हाेताे. त्यामुळे आगामी गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यावर महापालिकेने भर दिला आहे. जास्तीत जास्त मूर्तिकारांनी शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार कराव्यात यासाठी आता पालिकेने पुढाकार घेतला आहे. मूर्तिकारांना शाडू माती उपलब्ध करून देण्याची घाेषणा आयु्नत अनिलकुमार पवार यांनी केली हाेती. त्याच अनुषंगाने आता मूर्तिकारांना शाडू माती उपलब्ध करून दिली जाईल. सध्या महापालिकेने 1 हजार शाडू मातीच्या गाेणी मागवल्या आहेत. एक गाेणीत 40 किलाे इतकी शाडू माती असणार आहे. या मातीसाठी महापालिकेने दाेन लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे.