देशाला मेरीटाइम पाॅवर बनवणारे वाढवण बंदर जसे देशातील सर्वाेत्तम ऑफ शाेअर पाेर्ट हाेणार आहे, त्याचप्रमाणे सर्वाेत्तम ऑफ शाेअर एअरपाेर्ट मुंबईत उभारणार असून, ते मुंबईतील तिसरे एअरपाेर्ट असेल. याचे काम लवकरच सुरू हाेईल. राज्यात सध्या 24 जिल्ह्यांत विमानतळ आणि धावपट्टीची सुविधा आहे आगामी काळात 30 जिल्ह्यांत या सुविधा वाढवणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.केंद्रीय नागरी हवाई मंत्रालयामार्फत आयाेजित वेस्टर्न रिजन मिनिस्टर काॅन्फरन्समध्ये मुख्यमंत्री बाेलत हाेते.यावेळी केंद्रीय नागरी हवाई मंत्री के.राममाेहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ, गाेव्याचे पर्यटन मंत्री राेहन कुंटे, गुजरातचे नागरी हवाई मंत्री बलवंतसिंग राजपूत, मध्य प्रदेशचे परिवहन मंत्री उदय प्रताप सिंग, केंद्रीय मंत्रालयाचे सचिव समीर कुमार सिन्हा उपस्थित हाेते.
विमान वाहतूक क्षेत्रात केंद्र व राज्यांच्या समन्वयासाठी नाेडल अधिकारी नेमणार असून, केंद्र लवकरच ‘उडान यात्री कॅफे’ सुरू करणार आहे.सर्वसामान्य माणसाचे जीवन सुसह्य करणारे निर्णय केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालय घेत असल्याचे नायडू यांनी सांगितले. केंद्र व राज्याच्या समन्वयातून पश्चिम क्षेत्रातील राज्यांचे विमान वाहतूक क्षेत्रातील प्रश्न प्राधान्याने साेडवून विमान वाहतूक सेवा अधिक गतिमान करणे हे केंद्राचे ध्येय आहे, असे माेहाेळ यांनी सांगितले. कुंटे, राजपूत, उदय प्रताप सिंग यांनीही मनाेगत व्य्नत केले.यावेळी आपत्कालीन प्रशिक्षणविषयक भारतीय विमानपत्तन प्राधिकरण लिखित ‘फुल स्केल इमर्जन्सी माॅक ड्रील्स प्रिपेंरिंग एअरपाेर्टस फाॅर दी अनएक्सपेक्टेड’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.