
दीडशे वर्षांपासून या पुलाची कर्नाक पूल म्हणून ओळख आहे.भारतीयांना फसवणारा आणि अत्याचार करणारा कर्नाक हा ब्रिटिश गव्हर्नर असल्याने त्याच्या काळ्या इतिहासाच्या खुणा पुसण्यासाठी कर्नाक पुलाचे ‘सिंदूर’ नामकरण केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डी. मेलाे मार्गाला जाेडणाऱ्या या ‘सिंदूर’ (पूर्वीचे कर्नाक) रेल्वे उड्डाणपुलाचे लाेकार्पण करताना मुख्यमंत्री बाेलत हाेते.विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, काैशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लाेढा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार मनीषा कायंदे, माजी आमदार राज पुराेहित, मुंबईचे आयु्नत भूषण गगराणी, अपर आयु्नत अभिजितबांगर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित हाेते.रेल्वेवरचा पूल असल्याने तसेच दाटीवाटीच्या भागात असल्याने अडचणींवर मात करून मुंबई महापालिकेने कमी वेळात ऐतिहासिक जुन्या कर्नाक पुलाचे उत्कृष्ट बांधकाम केल्याने मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले. सिंदूर पूल मुंबईकरांना समर्पित करत हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी घाेषित केले.