अरिजित सिंगने संगीतकार अमाल मलिककडे काही सुंदर गाणी गायली आहेत.अमाल मलिक अरिजितचं काैतुक करताना थकत नाही.ताे म्हणताे, त्याने गायलेल्या गाण्यांमधलं व्हेरिएशन पाहा.आज ताे उगाच टाॅपला नाही.सर्व प्रकारची गाणी त्याच्या आवाजात खुलतात, ताे त्या गाण्यात काय गंमत आणताे ते गाणं नीट ऐकताना कळतं, छाेट्या छाेट्या जागा कळतात. ताे 100 टक्के समर्पित माणूस आहे. ताे पैशासाठी गात नाही. एक काेटी रुपये देताे, मी सांगताे ते गाणं गा, असं त्याच्या बाबतीत करता येत नाही.
ज्याच्यात त्याला काही चॅलेंज वाटेल असंच गाणं ताे गाताे, त्यात आपलं सर्व काही ओतताे. त्यामुळे ताे देवाच्या सगळ्यात जवळ असलेला माणूस आहे. अरिजितचा साधेपणाही दाखवेगिरीचा भाग नाही. ताे खराेखरच साधा आहे. एकदा अमालच्या मित्रांनी अरिजितचं मॅजिक काय असतं हे समजून घेण्यासाठी रेकाॅर्डिंगला येण्याची इच्छा व्यक्त केली. अमालच्या राेके ना रुके नैना या गाण्याचं रेकाॅर्डिंग हाेतं. मित्र खाली थांबले हाेते. एका छाेट्याशा मायक्रा गाडीतून अरिजित आला कधी, वर गेला कधी हे त्यांना कळलंच नाही. ते गप्पा मारत बसले. अर्ध्या तासाने अमालने त्यांना फाेन करून बाेलावलं, ताेवर अरिजितने अर्धं गाणं गाऊनही झालं हाेतं.