फ्रान्सच्या फेमस वाईनच्या टेस्टला क्लासिक समजण्यात येते, तर आता तिचा उपयाेग स्किनकेअर ट्रीटमेंटमध्येही हाेऊ लागला आहे. त्वचेला मऊ आणि हायड्रेट राखणारी आणि नॅचरली ग्लाे वाढविणारी ही ट्रीटमेंट विनाेथेरपी म्हणून ओळखली जाते. या थेरपीची सुरुवात फ्रान्समध्ये झाली हाेती. तिच्या वापराने त्वचेला मिळणाऱ्या लाभांमुळे ती इतर देशांमध्येही लाेकप्रिय हाेऊन गेली. आणि आता भारतातल्या काही मेट्राे सिटीजमध्येही विनाेथेरपीचा कन्सेप्ट पाहायला मिळताे आहे. विनाेथेरपी विशेष प्रकारची ब्यूटी आणि स्किनकेअर थेरपी आहे ज्यात द्राक्षे आणि वाईन आणि त्यातही विशेषतः रेड वाईनमधून मिळणाऱ्या तत्त्वांचा वापर त्वचेचे आराेग्य सुधारण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी हाेताे.
वाईनमध्ये त्वचेला तरुण, चमकदार आणि ताजे राखण्यासाठी उपयुक्त अँटीऑक्सिडंट्स असतात जे स्ट्रेस-लेव्हललाकमी करतात आणि डीप क्लीनिंग करून तिला माॅइश्चराइज आणि हायड्रेट करतात. या थेरपीमध्ये रेड वाईनचे सेवन करण्याऐवजी तिला त्वचेवर लावणे हा विनाेथेरपीचा भाग आहे. असं काही आवश्यक नाही की, सगळ्याच स्टेप्स फाॅलाे करायलाच हव्यात.कुठल्याही एका स्टेपला स्वीकारल्यासही त्वचेला लाभ मिळताेच हे नक्की! ही थेरपी इतर स्किन-ट्रीटमेंटपेक्षा महाग असते. परंतु, अँटीएजिंगसाठी फार प्रभावी समजण्यात येते.घरीदेखील ट्राय करता येईल : तुम्ही विनाेथेरपी घरीही आजमावू शकता. द्राक्षाच्या पल्पमध्ये मध आणि दही मिक्स करून चेहऱ्यावर लावावे. त्याला 15 मिनिटे राहू द्या. मग ते धुवून टाका. हा प्रयाेग आठवड्यातून तीनवेळा केल्याने दाेन महिन्यांत रिझल्ट दिसताे.