आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकऱ्यांना सार्वजनिक आराेग्य विभागामार्फत ‘भक्ती विठाेबाची, सेवा आराेग्याची’ या उपक्रमांतर्गत 9 लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना विनामूल्य आराेग्य तपासणी आणि औषधाेपचारात्मक आराेग्य सेवा पुरवण्यात आली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आराेग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आराेग्य राज्यमंत्री मेघना साकाेरे-बाेर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून आराेग्य विभागाने 9 लाख 23 हजार 509 वारकऱ्यांना आतापर्यंत आराेग्य सेवा पुरवली असून, परतीच्या वारीतही 10 जुलैपर्यंत विभागामार्फत वारकऱ्यांना आराेग्य सेवा पुरवण्यात येणार आहे. पालखी मार्गावर 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमार्फत आतापर्यंतएकूण 1114 वारकऱ्यांना अत्यावश्यक आराेग्य सेवा पुरवण्यात आली.
त्यामुळे या वारकऱ्यांना जीवनदान मिळाले.संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीसह विविध जिल्ह्यांतून आषाढीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालख्या आणि दिंड्यांत सहभागी झालेल्या लाखाे वारकऱ्यांना रस्त्यात काही त्रास जाणवलाकी लगेच उपचार मिळावेत, यासाठी आराेग्य विभागाने ‘भक्ती विठाेबाची, सेवा आराेग्याची’ या उपक्रमाद्वारे वारकऱ्यांना आराेग्य सेवा पुरवली. या उपक्रमाच्या माध्यमातून पालखी मार्गावर आराेग्य विभागातर्फे प्रतिबंधात्मक, उपचारात्मक, आराेग्य संदर्भ सेवा देण्यात आली. 5 चित्ररथांच्या माध्यमातून आराेग्य शिक्षण व जनजागृतीसाठी विभागामार्फत कल्पकपद्धतीने विविध उपक्रम राबवण्यात आले.
वारकऱ्यांना पालखी मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी माेफत आराेग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली. त्यासाठी विभागाचे 4376 अधिकारी आणि कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत हाेते.पालखी मार्गावर वारीमध्ये डाॅक्टर, नर्स, आराेग्य सहायक, आशा, आराेग्य सेवक, शिपाई, सफाई कामगार अशा सर्व कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रत्येक पाच कि.मी.वर ‘आपला दवाखाना’ उभारण्यात आला हाेता. तातडीच्या आराेग्य सेवेसाठी फिरत्या दुचाकी वाहनासह आराेग्यदूत तैनात ठेवण्यात आले हाेते.पालखी मार्गावर फिरते दुचाकी आराेग्यदूत प्रथमाेपचार पेटीसह सज्ज ठेवण्यात आले हाेते. त्यांच्या माध्यमातून वारकऱ्यांना तातडीची आराेग्य सेवा पुरवण्यात आली.याशिवाय 102 व 108 या क्रमांकाच्या अॅम्ब्युलन्सही पालखी मार्गावर सेवा देण्यासाठी कार्यरत हाेत्या.