पर्यटनाशी संबंधित प्लॅटफाॅर्म आणि पर्यटन कंपन्या, हवामानाशी संबंधित अनेक अडचणींना ताेंड देण्यासाठी सज्ज हाेत आहेत.खराब वातावरणामुळे उड्डाणाला उशीर, नियाेजन बदलांसाठी प्रवाशांकडून येणाऱ्या मागण्या, रद्द करावे लागणारे बुकिंग, मुसळधार पावसाळी हंगामात अशा अनेक समस्यांना सामाेरे जावे लागते. त्यामुळे, हे एजंट आता नव्या उपाययाेजना शाेधत आणि स्वीकारत आहेत.हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळे, उत्तराखंड व ओडिशात मुसळधार पावसामुळे, तर मुंबई, चेन्नई, बंगळुरू यांसारख्या शहरांतील पूरस्थितीमुळे यंदाच्या पावसाळी माेसमात पर्यटन प्रवासावर परिणाम झाला आहे. यामुळे, अनेक प्रवासी त्यांच्या पॅकेजमध्ये हवामानाशी संबंधित विमा समाविष्ट करत आहेत.आम्ही हवामानाचा अंदाज सातत्याने घेत आहाेत, विमान कंपन्यांशी समन्वय ठेवत आहाेत आणि लवचिक बुकिंग व फेर नियाेजनासाठी ग्राहकांना पर्याय उपलब्ध करून देत आहाेत,’ असे ईजमायट्रीपचे रिकांत पिट्टी यांनी सांगितले.
‘पर्यटक सध्या, विनाशुल्क रद्द करता येणारी किंवा लगेच बदलता येणारी पॅकेज, मागत आहेत. अनेक हाॅटेल आता, हवामानाशी सुसंगत सुविधा देत आहेत, ज्यात सहज चेक-इन करणे शक्य हाेते,’ पिट्टी म्हणाले.विमान प्रवासातील बदलत्या वेळा व हवामानाशी संबंधित अडथळे, हे आता वास्तव आहे. त्यामुळे, पर्यटन क्षेत्र आता अधिक लवचिक हाेताना दिसत आहे. प्रवाशांना अधिक पर्याय, सुरक्षितता, लवचिकता आणि त्वरित निर्णय घेता येणाऱ्या याेजना, हव्या आहेत.त्यामुळे आता काेणीही पर्यटक निश्चित प्लॅन ठरवत नाहीत, असे पिट्टी सांगतात.ऑनलाइन प्लॅटफाॅर्मनी असा ट्रेंड लक्षात घेत प्रवाशांसाठी हवामानावर आधारित विमा पाॅलिसीज सुरू केल्या आहेत. थाॅमस कुक आणि एसओटीसी ट्रॅव्हल, या कंपन्यांनी प्रवाशांसाठी 24 तास मदत करणारी सेवा सुरू केली आहे. या माध्यमातून पर्यटकांचे नुकसान हाेणाऱ्या परिस्थितीत त्यांचा खर्चही कव्हर केला जाताे.‘आमचे ग्राहक त्यांच्या संपूर्ण प्रवासादरम्यान सुरक्षित आणि संरक्षित असावेत, यासाठी ‘ट्रॅव्हशुअर’ हा प्लॅन सुरू करण्यात आला आहे. आजच्या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर, हवामान अनिश्चित आहे आणि तेव्हा अशी विमा सुरक्षा अत्यावश्यक ठरते,’ असे पर्यटन व्यावसायिक राजीव काळे म्हणाले.
अखिल भारतीय पर्यटन संघटनेचे अध्यक्ष रवी गाेसाइं म्हणाले, ‘प्रवाशांना हवामानाच्या अडचणींचा सामना करताना विमा कव्हरेज असलेले पर्याय हवे असतात. ग्राहक आता जागरूक झाले असून, हवामानाप्रमाणे बदलणाऱ्या आणि सुरक्षित असणाऱ्या ‘टेलर-मेड पॅकेजेस’ची मागणी वाढली आहे. काही कंपन्या हवामानावर आधारित रिअल टाईम ट्रॅकिंग सेवा देण्याचाही विचार करत आहेत. ‘आता भारतीय प्रवाशांमध्ये ‘साेजर्नर ट्रॅव्हलर’ नावाची एक नवीन संकल्पना रुजते आहे. हे प्रवासी कुठेही एकाच ठिकाणी फार काळ थांबत नाहीत आणि सहसा अंतिम निर्णयही तातडीने घेतात. आम्ही आता वेट अँड वाॅच पद्धतीत प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ बघताेय,’ काॅक्स अँड किंग्सचे करण अगरवाल यांनी सांगितले.सध्या अनेक प्रवासी ‘स्पाॅन्टेनियस ट्रॅव्हल’ म्हणजे अचानक निर्णय घेऊन कुठेही जाण्याचा कल ठेवत आहेत. त्यांना लवचिकता हवी असते, पण त्याच वेळी त्यांच्या बुकिंगला विश्वासार्हतेची गरजही असते. पर्यटन कंपन्यांनीही आता ‘फ्लेक्सी हाॅलिडेज’ संकल्पना आणली आहे, ज्यामध्ये ग्राहक कधीही बुकिंग बदलू शकतात,’ अगरवाल सांगतात. उशिराने प्रवास ठरवणाऱ्यांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढली आहे.