मुलांसाठी पालक हेच विश्व लहान मुलांसाठी आई-वडील, घर हेच त्याचे एक विश्व असते. त्यामुळे पालकांमध्ये भांडणे हाेणे, अबाेला निर्माण हाेणे, एकमेकांचा आदर न करणे यामुळे मुले निराश हाेऊ लागतात. मुलाला त्याच्या आयुष्यात एकटे वाटू लागते! मनावर खाेलवर परिणाम हाेताे घरातील तणावग्रस्त वातावरणामुळे काही मुले एकांतात रडतात. घाबरतात. स्वतःच्या, कुटुंबाच्या अस्थिरतेची त्यांना भीती वाटते. धास्ती बसते. त्यामुळे रात्री-अपरात्री ते दचकतात. पालक सतत का भांडतात, एकमेकांचा दुःस्वास का करतात, माझ्यावरही प्रेम करीत नाहीत का, त्यांचे एकमेकांशी पटत नाही, तर मग मी कुठे जाऊ? आणि माझ्या मनातील गाेंधळ कुणाला सांगू? अशा प्रश्नांनी ते त्रस्त हाेतात.किशाेरवयीन मुलांच्या मनातील गाेंधळ आणि तक्रारी वाढतात.
मुलांचे एकटेपण हल्ली अनेक घरांत एकच मूल असते. त्यांना सख्खे बहीण- भाऊ नसल्याने आपल्या भावना ते कुणापाशी व्यक्त करू शकत नाहीत. घरातील तणावाचा त्यांना एकट्यानेच सामनकरावा लागताे. या विषयावर घराबाहेर ते कुणाला काही सांगू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचा मानसिक काेंडमारा हाेताे. मित्र, शेजाऱ्यांनी विचारल्यास काय उत्तर द्यावे, त्यांनी चेष्टामस्करी केली तर काय हाेईल, अशा विचारांनी मुले हैराण हाेतात.मुले नैराश्याचे शिकार बनू शकतात व्हिएतनामचे बाैद्ध भिक्षु, प्रसिद्ध लेखक तिक न्यात हन्ह यांनी सांगितले, की 5 ते 12 वर्षांची मुले नैराश्याची शिकार बनू शकतात. मुलांसाठी अशी परिस्थिती खराेखरच फार चिंताजनक आणि भावनात्मक असते. त्यांची आकलनशक्ती, सहनशीलता वाढण्यास सुरुवात झालेली असते. ती खूप काेवळी असते. त्यामुळे आई-वडिलांमधील संघर्ष ते सहन करू शकत नाहीत. मूल स्वतःला एकाकी आणि असुरक्षित समजू लागते.
स्वतःचा हा मानसिक गाेंधळ ते कुणाला सांगू शकत नाहीत. स्वतःचे विचार स्पष्टपणे व्यक्तही करू शकत नाहीत. मुला-मुलींना भीतिदायक स्वप्ने पडतात. ते झाेपेत बरळतात. कधी मुले हबकून रडू लागतात. मित्र-मैत्रिणींबराेबर खेळायला जात नाहीत.मुलांवर मानसिक अत्याचार मानसाेपचार तज्ज्ञ सांगतात, की कुटुंबात सतत तणावाच्या परिस्थितीमुळे मुलांवर मानसिक अत्याचार हाेतात. काेवळ्या मनावर झालेल्या या अत्याचारांचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर, वाढीवर परिणाम हाेताे. या आघातांमुळे पुढील काळात मुले चुकीच्या मार्गाने जाऊ शकतात. अशा प्रकारच्या वातावरणातून गेल्यावर मुले व्यसनाधीन हाेऊ शकतात. शिक्षण अर्धवट साेडू शकतात. काेणावरही विश्वास ठेवणे त्यांना अवघड जाते.
सध्या पती-पत्नी दाेघेही शिक्षित, माेठ्या पदांवर काम करणारे, आर्थिकदृष्ट्या सक्षम असले, तरी घरात समजूतदारपणा दाखविणे त्यांना जमत नाही. बाहेरचे तणावही घरातच व्यक्त हाेतात. त्यामुळे दाेघांमध्ये टाेकाची भांडणे हाेताना दिसतात.पालकांमधील वाद, भांडणांचा सगळ्यात वाईट परिणाम हाेताे ताे किशाेरवयीन मुलांवर. मुले गांगरून जातात.पती-पत्नीचा एकमेकांवरील राग भांडताना मुलांसमाेर व्यक्त हाेताे. कधी कधी मुलांवरही व्यक्त हाेताे.अबाेध मनाची मुले खूपच संवेदनशील असतात. त्यांचे वय ना लहान असते, ना खूप माेठे. त्यांच्यात आत्ता कुठे हळूहळू समजूतदारपणा वाढू लागलेला असताे. पण, ते इतकेही समजूतदार नसतात, की पालकांचे नाते, त्यांच्यातील भावबंध समजू शकतील. त्यांच्या भांडणाचे कारण समजू शकतील.