अनुसूचित जातीतील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आता गुणवत्तेवर प्रवेश, तसेच नाेकऱ्या मिळवण्याचा प्रयत्न करावा व आरक्षणाचा लाभ अनुसूचित जातीतील अधिक गरजू युवकांना घेऊ द्यावा, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन साेसायटीचा 80 वा वर्धापन दिन राज्यपालांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बाेलत हाेते. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ व संस्थेचे विश्वस्त अॅड. उज्ज्वल निकम, सामाजिक न्याया मंत्री संजय शिरसाट, यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित हाेते.आपण पीपल्स एज्युकेशन साेसायटीच्या सिद्धार्थ महाविद्यालयाचे विद्यार्थी हाेताे याचा अभिमान वाटताे.राजकीय आणि सार्वजनिक जीवनाची पायाभरणी याच संस्थेमधून झाली आहे.
पीपल्स एज्युकेशन साेसायटी स्वायत्त विद्यापीठ झाल्यास संस्थेला नवनवीन अभ्यासक्रम राबवता येतील, असे सांगून पाटील यांनी संस्थेच्या विकासासाठी शासनाच्या वतीने सहकार्याची ग्वाही दिली. आठवले, शिरसाट व अॅड. निकम यांनीही यावेळी मनाेगत व्यक्त केले.यावेळी राज्यपालांच्या हस्ते संस्थेचेदाेन माजी विद्यार्थी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, तसेच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 20 व्यक्तींना भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आले.ज्येष्ठ अभिनेते भाऊ कदम, अभिनेत्री क्रांती रेडकर, भदंत डाॅ. राहुल बाेधी, दक्षिण काेरिया येथील धम्मदीप भंते, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळणकर, अॅड.सुरेंद्र तावडे, बळीराम गायकवाड यांचा यात समावेश हाेता.