कमी फॅटचे असते स्किम्ड मिल्क : या दुधातून फॅट काढले जातात.यात फक्त 0.3 टक्क फॅटच असते.पण प्राेटीन, फाॅस्फाेरस, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन डी व कॅल्शियम असते.व्हिटॅमिन डीच्या मदतीने शरीर कॅल्शियम शाेषू शकते. या दुधात फुल क्रीम दुधापेक्षा कमी कॅलरीज असतात. वजन घटवण्यासाठी वा संतुलित ठेवण्यासाठी स्किम्ड दूध प्यायला हवे.
गायी-म्हशीचे एकत्रित दूध : टाेन्ड मिल्क तयार करण्यासाठी स्किम्ड मिल्क पावडर पाण्यात व म्हशीच्या फुल क्रीम दुधात मिसळले जाते. म्हशीच्या दुधात 7 ते 8 टक्के फॅट असते. जे या प्रक्रियेनंतर 3 टक्के राहते. टाेन्ड मिल्कमध्ये पाेषणाचे प्रमाण जवळपास गायीच्या दुधासमान असते. यात प्राेटीनही असते जे सहजतेने पचते. जर वाढत्या वजनाने त्रस्त असाल वा गर्भवती असाल तर हे दूध घेऊ शकता.
सर्वांत कमी फॅटचे दूध डबल टाेन्ड : डबल टाेन्ड मिल्क यूनिसेफने कमी उत्पन्न गटातील व निर्वासित लाेकांपर्यंत दूध देण्यासाठी तयार केले आहे. हे टाेन्ड दुधाप्रमाणेच तयार केले जाते. फक्त यात फॅट आणखी कमी केले जातात. 1.3 फॅटचे हे दूध हृदयराेगांपासून वाचवते व वजन वाढू देत नाही. टाेन्ड व डबल टाेन्डपैकी दुधाची निवड वजन