पुन्हा सध्याच्या काळात व्हिडिओ काॅल्स, टेक्स्ट मेसेजेस, रेग्युलर काॅल्स करण्याची सुविधा उपलब्ध आहे.अधूनमधून संपर्कात राहिल्याने अंतरातील दुरावा जाणवणार नाही. दाेघे जरी शरीराने लांब असलात तरी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तुम्ही जवळ येऊ शकता, संपर्कात राहू शकता.
चांगल्या प्रकारचा संवाद: वेळाेवेळी जास्त व्हिडिओ काॅल, चॅटिंग आणि रेग्युलर काॅल्स करत रहा. हे प्रमाण वाढवले म्हणून काही बिघडत नाही. निकाेप नात्यासाठी संवाद महत्त्वाचा असताे. जेव्हा तुमच्याबाबतचे सगळे अपडेटस् तुम्ही जाेडीदाराला देततेव्हा संवादाची दारे खुली हाेतात आणि तुम्ही दाेघे मनाने एकत्र असल्याची भावना तीव्र हाेते. सध्या प्रत्येकजण चिंताग्रस्त आणि काहीसा तणावात आहे.त्यामुळे संपर्कात राहिल्याने जाेडीदाराची मानसिक स्थिती समजते. किंबहुना संवादामुळे परस्परांना धीर मिळताे.खाणेपिणे, दैनंदिनी, कामाचे स्वरुप, आराेग्य, राेजचा व्यायाम याबाबत विचारपूस करा. जाेडीदाराच्या मानसिक आराेग्याची काळजी घेणे हे एक म हत्त्वाचे काम असते.
आपुलकीने, मायेने वागा: स्वतःशी आणि जाेडीदाराशी आपुलकीने आणि मायेने बाेला.वादविवाद टाळा. टाेकाची प्रतिक्रिया, राग व्यक्त करणे, टीका करणे अशा गाेष्टी टाळा. लक्षात घ्या सध्या प्रत्येकजण अस्वस्थ आहे. त्यामुळे मनात खदखद निर्माण हाेऊ शकते. त्यातून मग चिडचिड, राग, आरडाओरडा असे काही घडू शकते. ते टाळण्यासाठी दुसऱ्याला समजावून घेऊन आदराने आणि शांतपणे बाेला. जर तुमचा जाेडीदार कामात यस्त असेल आणि नंतर ाेन करताे म्हणाला तर त्याला समजावून घ्या.त्यातून वेगळे अर्थ काढू नका. कारण सध्याच्या काळात परिस्थितीवर कुणाचेच नियंत्रण नाही.
स्वतःची काळजी आणि मनाची धारणा: या कालावधीत स्वतः ची सर्व प्रकारे काळजी घ्या.सध्याच्या काळात तुम्ही आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीसाेबत नसाल तर स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी काही चांगल्या आणि सकारात्मक गाेष्टी करा. वाचन, संगीत ऐकणे, वाद्य वादन, टीव्हीवर चित्रपट पाहणे, बागकाम करणे, अनुभवांचे लिहून ठेवणे अशा गाेष्टीतून मन आणि मेंदू व्यस्त राहताे आणि मनात नकारात्म क विचार येत नाहीत. त्याचबराेबर याेगासने आणि प्राणायमासाठी जास्त वेळ दिला तर नक्कीच मनाला हलके वाटेल. मन शांत राहिल आणि तणावम ुक्तीची अनुभूती येईल.