भारत-पाकिस्तानमध्ये सध्यातरी युद्धबंदी झाली आहे. तरी, शेजारील देशांचे कारस्थान बंद न झाल्यास युद्धाची स्थिती निर्माण हाेऊ शकते.रशिया-युक्रेन, इराण-इस्त्रायल-अमेरिका या संघर्षाच्या बातम्याही कानावर येत असतात.
युद्धाचा मानसिक तणाव
युद्ध काेणत्याही स्थितीत नुकसानकारक असते. युद्ध अनेक मानसिक समस्यांनाही आमंत्रण देते. ताण-तणाव निर्माण हाेताे.मनाेवैज्ञानिक भाषेत याला युद्धाचा मानसिक तणाव (वाॅर एन्गझायटी) म्हटले जाते. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासानुसार, वाॅर एन्गझायटी म्हणजे युद्धाचे भय. युद्ध किंवा संघर्षाच्या बातम्या, चित्रे पाहिल्यावर ही एक सामान्य मानसिक प्रतिक्रिया असते. जग काेराेना, रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या छायेत हाेते. त्यानंतर भारत-पाकिस्तान, इराण-पॅलेस्टाइन यांच्यामधील युद्ध परिस्थितीमुळे अनेक लाेकांमध्ये वाॅर एन्गझायटी पाहायला मिळाली.
आधीच्याच तणावात अधिक भर
सध्या अनेक लाेक कामाचा तणाव, आर्थिक प्रश्न, काैटुंबिक समस्यांमुळे मानसिक दबावाखाली दिसतात. अशात युद्धसदृश स्थितीची निर्मिती लाेकांमध्ये ताण-तणाव वाढविण्याचे काम करेल. विशेषतः अशा लाेकांमध्ये, ज्यांच्यात आधीपासून एन्गझायटी (चिंता,काळजी) असते.
अशांततेच्या बातम्यांनी तणाव आणखी वाढताे
हार्वर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या संशाेधनात स्पष्ट झाले, की जे लाेक आधीपासूनच चिंतेने त्रस्त असतात, ते अशा आणीबाणीच्या परिस्थितीत, समस्यांच्या काळात जास्तीत-जास्त बातम्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. त्या परिस्थितीत सतत अडकून, गुंतून पडतात. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती अधिकच बिघडू शकते. या चिंतेचे आणि माहिती गाेळा करण्याच्या व्यसनाचे एक दुष्ट-चक्र बनते. जेवढे जास्त तुम्ही पाहत असता, तेवढे जास्त बैचेन हाेत असता. मनाेचिकित्सकांच्या मते, अशा बातम्या चिंताग्रस्त लाेकांसाठी उत्तेजक म्हणून कार्य करतात. प्रत्येक तासानंतर घनघाेर युद्धाच्या बातम्या, विस्फाेटांचे कान फाडणारे प्रचंड आवाज आणि संभावित हल्ल्यांचे भय त्यांच्या मानसिक आराेग्याला अधिकच कमजाेर करतात.
नकारात्मक बातम्यांमुळे तणाव वाढताे
सतत नकारात्मक बातम्या पाहिल्यामुळे मेंदूमध्ये तणाव हाॅर्माेन्सचा स्तर वाढताे. अशा बातम्या सतत पाहिल्यामुळे लाेकांमध्ये पाेस्ट ट्राेमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पीटीएसडी)ची समस्या वाढू शकते. तणावाच्या परिस्थितीत लाेकांना झाेप येत नाही. त्याचा थेट मेंदूवर परिणाम हाेताे. भय आणि चिंता लाेकांच्या मानसिक आराेग्याला नुकसान पाेचवतात; ज्यामुळे लाेकांना भीती वाटणे, चिडचिडेपणा आणि अनिद्रासारख्या समस्या हाेतात.
अशा स्थितीमध्ये जर त्यांच्या समस्यांवर वेळीच लक्ष दिले नाही तर असे लाेक गंभीर मानसिक रुग्ण बनू शकतातधीर धरा, शांतपणे विचार करा: घाटकाेपरमधील मानसाेपचारतज्ज्ञ नेहा शहा यांनी सांगितले की, युद्धासारख्या परिस्थितीत, परिणाम स्वतःचे आणि कुटुंबीयांचे रक्षण करण्यासाठी फारच सतर्क हाेतात.भूतकाळात पाहिलेल्या आणि ऐकलेल्या युद्धाच्या गाेष्टी, चित्रपट आठवल्याने ते अधिकच तणावग्रस्त हाेऊन जातात. अत्यंत सतर्क राहण्याचे कर्तव्य निर्माण हाेते. कर्तव्य बजावण्यात कुठली उणीव तर नाही ना? आपल्या दुर्लक्षाने कुठली अडचण तर निर्माण हाेणार नाही ना? याची काळजी वाटत राहते. जर असा तणाव खूप दिवसांपर्यंत राहिल्यास ताे एका मानसिक आजारात देखील रूपांतरित हाेऊ शकताे. नाही तर सदर व्यक्तीच्या स्वभावात बदल घडू शकतात. या व्यक्ती अधिक पझेसिव्ह हाेतात. इतर लाेकांपासून अलिप्त हाेणे, माैन राहणे, नकारात्मक विचार करणे असे त्यांचे वागणे हाेते. म्हणून अशा स्थितीमध्ये धीर धरायला हवा. शांतपणे विचार केला पाहिजे आणि सगळ्यांच्या सान्निध्यात राहिले पाहिजे.
लाेक घरापासून दूर जाण्याचे टाळतात:नेहा शहा यांनी वाॅर एन्गझायटीचे उदाहरण देताना सांगितले, की मुंबईत राहणाऱ्या एक महिला कुटुंबाबराेबर उन्हाळ्याच्या सुट्टीत उत्तरेतील राज्यात जाणार हाेती.पण भारत-पाकिस्तानमध्ये अचानक युद्धासारखी स्थिती निर्माण झाल्याने त्यांनी ट्रिप रद्द केली. त्याचबराेबर आता तिला या वर्षी कुठे लांबवरच्या प्रवासाला जाण्याची इच्छाही नाही. घराच्या बाहेर कुठेही जाण्यास तिने नकार दिला. दुसरे एक कुटुंब सुट्टीसाठी महाबळेश्वरला जाण्याचा बेत आखत हाेते. परंतु युद्धाच्या काळजीने त्यांनी बेत रद्द केला. त्यांचे म्हणणे आहे, की अनाेळखी ठिकाणी काही बरवाईट झालं तर आम्ही काय करू शकताे? सांगायचे तात्पर्य हे आहे, की लाेक जास्त विचारांनी बैचेन हाेतात आणि तणावात येतात. तसेच जी गाेष्ट त्यांना आनंद देऊ शकते किंवा मूड बूस्टर प्रमाणे काम करू शकते, अशा गाेष्टीपासून ते दूर राहतात!
तुम्ही नेहमी साेबत आहात याची खात्री मुलांना द्या: आंतरराष्ट्रीय स्तरावर हाती घेतलेले अभ्यास दर्शवितात, की युद्ध आणि संघर्षाच्या बातम्या मुले आणि प्राैढ वयाच्या अशा दाेन्ही वयाेगटांच्या मानसिक आराेग्यावर खाेलवर परिणाम करतात. युद्धाच्या बातम्या आणि विस्फाेटांचे आवाज मुलांसाठी फारच भयानक असतात. टीव्हीवर पाहिलेल्या बातम्याही त्यांना घाबरवून साेडतात. मुले या घटनांमागील गुंतागुंत समजू शकत नाहीत. पण, बहुतेकदा त्यांच्या मनात भीती घर करते. याहीपेक्षा वाईट म्हणजे - भीतिदायक स्वप्ने पडणे, अंथरून ओले करणे आणि समाजात मिळून-मिसळून वागण्यात समस्या हाेऊ शकतात.
अशा स्थितीत आहारापासून कामापर्यंतच्या सर्व गाेष्टींवर परिणाम हाेऊ लागताे. या बाबतीत सायकाेलाॅजिस्ट डाॅ. मिहीर पारेख यांनी सांगितले, की मुलांसाठी युद्ध अजूनपर्यंत चित्रपटांपर्यंतच मर्यादित हाेते. त्यांनी कधीही त्यांच्या आसपास असा अनुभव घेतला नाही. त्यामुळे त्यांना भीती वाटणे स्वाभाविक आहे. पालकांनी युद्ध-तणावविषयक बातम्या श्नयताे मुलांसमाेर पाहू नयेत. पालक स्वतःच युद्धाविषयी चिंतीत दिसल्यास स्वाभाविकच मुलेही तसाच प्रतिसाद देतील. मुलांना युद्धाच्या गंभीरतेविषयी माहिती देऊ नका. कारण युद्ध समजण्याइतकी समज त्यांच्यात विकसित झालेली नसत