ऑफिसमधील गाॅसिप करणाऱ्यांना टाळणे हाच पर्याय याेग्य असताे...

    10-Jul-2025
Total Views |
 

office 
 
संभाषणाचा ट्रॅक बदला: अनाकलनीय, द्वेषयुक्त किंवा डावपेचात्मक अफवांच्या गप्पांमध्ये तुम्हांला ओढण्याचा प्रयत्न म्हणून तुमच्यासमाेर अशा गप्पा सुरु झाल्या की, तुम्ही विषय बदला. लगेच पगारवाढ, अप्रायजल रिपाेर्ट किंवा ऑिफस पार्टीविषयी बाेलायला सुरवात करा.अनावश्यक गावगप्पांऐवजी नवीन विषयाला सुरवात करताना ताे तितकाच पाॅवरुल असेल याची काळजी घ्या. जेणेकरून सगळ्यांना त्याविषयावर बाेलायला आवडेल.
 
सकारात्मक बाेलणे: गाॅसिपिंग करणाऱ्यांना साैम्य भाषेत उत्तर द्यायचे असेल तर सकारात्मक भूमिका मांडणे प्रभावी ठरते.ऑिफसमध्ये गाॅसिपिंग करणाऱ्यांचा वर्ग असा असताे की त्यांना सगळ्यांमधील नकारात्मक गाेष्टी दिसत असतात. त्यामुळे प्रत्येकावर टीका करण्याची त्यांना सवय लागलेली असते. तुम च्यासमाेर कुणीही एखाद्याबद्दल असे नकारात्मकमत मांडू लागला की त्या व्यक्तीचे चांगले गुण सांगायला सुरवात करा. त्या व्यक्तिंविषयीचा चांगला अनुभव सांगा. त्यामुळे नकारात्मक बाेलणाऱ्या व्यक्तिला त्याची जागा समजते.
 
मनाला लावून घेऊ नका: गाॅसिपमधील गप्पांमध्ये अजिबात गांभीर्य नसते. गप्पा मारणाऱ्यांनाही कुणी गांभीर्याने घेत नाही.त्यामुळे गाॅसिप कधीही गांभीर्याने घेण्याची गरज नसते. गाॅसिपवर तुम्ही व्यक्ती म्हणून रअ‍ॅक्ट हाेऊ लागला किंवा बचावात्मक भूमिकेत गेला तर गाॅसिप करणाऱ्यांना आणखी प्राेत्साहन मिळते. गाॅसिपिंगमागे अनेक कारणे असतात. बहुतेकवेळा ते सगळे ऐकीव माहितीवर आधारीत असते. त्यामुळे वस्तुनिष्ठ माहिती घेऊन शहानिशा करा. हे करताना गाॅसिपिंग करणाऱ्यांकडे अजिबात लक्ष देऊ नका किंवा त्यांना प्रतिसादही देऊ नका.
 
शिंताेडे उडवण्यात सहभागी हाेऊ नका: अफवा आणि गावगप्पांवर विसंबून त्रयस्थ व्यक्तिच्या चारित्र्यावर शिंताेडे उडवण्यात सहभागी हाेऊ नका. गाॅसिप मशिन्सचा तुम्ही भाग हाेऊ नका. जेव्हा गप्पांची दिशा गाॅसिपिंगकडे जाते आहे असे वाटले तेव्हा लगेच तिथून बाजूला व्हा. शेवटी लक्षात ठेवा, कुपमंडूक वृत्ती नेहमीच लाेकांविषयी बाेलतात आणि महान व्यक्तिमत्वे नेहमी नव्या आणि अभिनव कल्पनांविषयी बाेलतात.