महागड्या ब्रँड्सच्या ऐवजी श्रीमंत ग्राहकांची फॅशनला पसंती

10 Jul 2025 22:56:57
 
 

brand 
देशातील तरुण पिढी आणि उच्च उत्पन्न गटातील ग्राहक आता एकाच महागड्या डिझायनर पाेशाखाऐवजी, विशेष प्रसंगांसाठी वेगवेगळे परवडणारे पाेशाख खरेदी करत आहेत. यामुळे, महागडे कपडे कपाटात पडून राहण्याऐवजी, स्वस्त आणि फॅशनचे कपडे वेगवेगळ्या प्रसंगांत वापरले जावेत, अशी नवी संकल्पना आहे. या नव्या ट्रेन्डमुळे अनेक नवे आणि परवडणारे ब्रँड्स बाजारात आले असून, प्रसिद्ध डिझायनर्सनाही त्यांचे डिझाइन्स वाढवणे आणि किमती उतरवणे गरजेचे झाले आहे.डिझायनर जयंती रेड्डी म्हणतात, ‘सध्या हलक्याफुलक्या कुर्त्यांना चांगली मागणी आहे, विशेषतः भरजरी कुर्त्यांची 40 वर्षांवरील महिलांमध्ये क्रेझ आहे. त्यांच्या, रेडीटू-वेअर (तयार कपडे) विभागाने गेल्या काही वर्षांत एकूण विक्रीत 50% व्यवसाय दिला आहे. रेड्डी आता हाच व्यवसाय दुप्पट करण्याची याेजना आखत आहेत.
 
त्यांच्या दुसऱ्या स्टाेअरमध्ये वधूच्या महागड्या पाेशाखांऐवजी, वेगवेगळ्या प्रसंगासाठी असणाऱ्या किफायतशीर पाेशाखांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्यांचे दिल्लीमध्ये दाेन स्टाेअर असून, मुंबई व हैदराबादमध्ये प्रत्येकी एक आहे.’ दिल्लीतील डीएलएफ एम्पाेरिओ स्टाेअरमध्ये, फाेकस पूर्णपणे 1.5 लाखांखालील वेगवेगळ्यकार्यक्रमांच्या पाेशाखांवर आहे. रेड्डी म्हणाल्या, ‘परवाडणाऱ्या फॅब्रिक्सच्या श्रेणीत, आम्हाला थेट दुकानात आलेले ग्राहक, अगदी आंतरराष्ट्रीय ग्राहकही मिळतात. हे वधूच्या महागड्या कपड्यांच्या विभागाच्या तुलनेत खूप वेगळे दालन आहे, जिथे ग्राहक अपाॅइंटमेंट घेऊन येतात.’ ‘भारतात, वधू आणि लग्न समारंभ पाेशाखांचा बाजार माेठा आहे, ज्यात छाेट्या- माेठ्या डिझायनरनी भर घातली आहे. परंतु, बहुतेक ब्रँड्सच्या किमती इतक्या जास्त आहेत, की अनेकांना ते परवडत नाहीत,’ असे वझीर अ‍ॅडव्हायजर्सचे हरमिंदर साहनी म्हणाले. त्यांच्या मते 50,000 रुपयांच्या खालील विभागात माेठा व्यवसाय आहे.ग्राहक आता विवाहसमारंभ, वाढदिवस, खास मैत्रिणींच्या गेट टुगेदर किंवा छाेटे लग्नसमारंभ यांसारख्या प्रसंगांनुसार वेगळे पाेशाख घालू इच्छितात.
 
डॅश अ‍ॅण्ड डाॅटचे अश्रय गुजराल म्हणाले, ‘भारतात, वजनाने हलक्या, किफायतशीर व प्रासंगिक पाेशाखांसाठी एक माेठा ग्राहक आहे. तरुण व फॅशनची जाण असणारे ग्राहक, हे पाेशाख केवळ एकदाच वापरण्यापेक्षा पुन:पुन्हा वापरण्यायाेग्य असावेत, असा विचार करतात.’ किरकाेळ विक्रेत्यांच्या मते, 25 ते 40 वयाेगटातील ग्राहकांकडून सर्वाधिक मागणी येते.माेठ्या मल्टी-ब्रँड कंपन्यांनी सांगितले की, ‘सुमारे 20% व्यवसाय या वयाेगटाकडून येताे.यामध्ये, जातीला अनुसरून आणि प्रसंगानुसार पाेशाखांचा माेठा वाटा आहे.’ साहनींच्या मते, ‘मध्यवर्गीयांच्या वाढत्या खरेदी क्षमतेमुळे हे सध्या ट्रेंड वाढत आहेत.’ एका माेठ्या भारतीय मल्टी-ब्रँड रिटेलरने सांगितले की, ‘आमचा सुमारे 20% व्यवसाय 35,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या डिझायनर पाेशाखांमधून येताे. त्याचप्रमाणे, एकूण विक्रीपैकी सुमारे 60% उत्पन्न 50,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या आणि अंश्री रेड्डी, सीमा गुजराल, अमित अग्रवाल यांसारख्या डिझायनर्सच्या पाेशाखांमधून मिळते. तथापि, 10,000 ते 15,000 रुपयांच्या खालील श्रेणीत फारशी मागणी नाही, त्यामुळे किरकाेळ विक्रेते ही श्रेणी टाळू पाहतात.’
Powered By Sangraha 9.0