आसामची प्रसिद्ध माॅडेल आणि साेशल मीडिया एन्फ्लूएन्सर अर्चिता फुकन, जिला साेशल मीडियावर बेबी डाॅल आर्ची म्हणून ओळखलं जातं, तिचा एक फाेटाे नुकताच साेशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या फाेटाेमध्ये तिच्यासाेबत अमेरिकन अॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध केंड्रा लस्ट दिसतेय, जी सध्या साेशल मीडियावर त्सुनामी घेऊन आली आहे. हा फाेटाे साेशल मीडियावर व्हायरल हाेत आहे.ताे आर्चीच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या फाेटाेमध्ये बेबी डाॅल आर्ची आणि केंड्रा लस्ट एकत्र दिसताहेत.बेबी डाॅल आर्ची आणि केंड्रा लस्टचा फाेटाे समाेर येताच ताे वेगाने व्हायरल झाला आणि ही असामान्य जाेडी लाेकांच्या नजरेत आली. फाेटाेच्या कॅप्शनमध्ये आर्चीनं केंड्रा लस्टचा आत्मविश्वास, काैशल्य आणि यशाचं काैतुक केलं आहे. तसेच, तिनं हा क्षण कायम आठवणीत राहणारा आहे, असंही म्हटलं आहे. बेबी डाॅल आर्ची आणि केंड्रा लस्टचा फाेटाे व्हायरल झाल्यानंतर असे अंदाज बांधले जात आहेत, की आर्चीनं अमेरिकी अॅडल्ट इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं आहे.दरम्यान, आर्चीनं मात्र यावर अद्याप काेणतंही भाष्य केलेलं नाही.