चीनमध्ये ‘एआय’द्वारे अद्वितीय रुग्णालय चालविले जाते

10 Jul 2025 22:53:37
 

Health 
 
चीनच्या सिंगवा विद्यापीठाच्या एआय रिसर्च डिपार्टमेंटने जगातील पहिले एआय-पाॅव्हर्ड हाॅस्पिटल तयार केले आहे. हाॅस्पिटलचे नाव ‘एजंट हाॅस्पिटल’ आहे. या ‘एआय एजंट’ला राेगांचे निदान त्वरित करण्यासाठी तयार केले गेले आहे.यामुळे डाॅक्टरांचे कामाचे ओझे कमी हाेईल. दिवसातून बऱ्याच रुग्णांवर उपचार करणे शक्य हाेईल.विद्यापीठाच्या संशाेधकांनी तयार केलेल्या या व्हर्च्युअल हाॅस्पिटलमध्ये 14 एआय डाॅक्टर आणि 4 एआय परिचारिका आहेत. या डाॅक्टर आणि परिचारिकांच्या पथकांत 24 तासांत 3 हजार रुग्णांच्या राेगांचे निदान करण्याची क्षमता आहे. या एआय हाॅस्पिटलमुळे नेहमीच्या डाॅक्टरांच्या अपाॅइंटमेंटससाठी लागणारा वेळ कमी हाेणार असून, रुग्णांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे.
 
हे रुग्णालय एक प्रकारे ऑनलाइन व्यासपीठ आहे. तेथे 21 क्लिनिकल विभाग आहेत. या एआय चालित रुग्णालयात रुग्णांच्या विविध राेगांची त्वरेने पाहणी केली जाते आणि याबराेबरच एआय डाॅक्टरांसाठी उपचार करण्याची याेजना येथे आखली गेली आहे. राेगाची लक्षणे पाहून त्याबाबत हाेणाऱ्या तपासण्या, राेगाचे निदान, उपचार करण्यासाठी आणि पाठपुरावा करण्यासाठी, हे आय डाॅ्नटर याेग्य निर्णय घेऊन ते पुढे नेहमीच्या डाॅ्नटररांकडे पाठवू शकतात. विद्यापीठाच्या संशाेधकांनी हे एआय डाॅक्टर मानवी डाॅक्टरांची जागा घेऊ शकत नाहीत, परंतु त्यांना मदत करू शकतील याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
Powered By Sangraha 9.0