आजकाल इंटरनेटवर अनेक तज्ज्ञ, दीर्घायुष्याचे रहस्य सांगताना डाएट्स, सवयी आणि विशिष्ट फाॅर्म्युला सांगताना दिसतात.परंतु वास्तवात, दीर्घायुष्य हे आनुवंशिक असते का, की ते आपल्या जीवनशैलीवर अवलंबून असते? इंद्रप्रस्थ अपाेलाे हाॅस्पिटलच्या एंडाेक्रिनाॅलाॅजिस्ट, डाॅ. ऋचा चतुर्वेदी यांनी या विषयावर आपली स्पष्ट मते मांडली.‘दीर्घायुष्य, हे आपल्या आई-वडिलांकडून मिळणाऱ्या जनुकीय गुणांवर तर अवलंबून असतेच, त्याचबराेबर, आपली दिनचर्या, आहार, व्यायाम, तणाव नियंत्रण आणि आपली जीवनशैली, यावरही आपले आयुष्यठरते. सिगारेट, दारू यांसारख्या सवयींपासून दूर राहणे, यावरही जीवनाची लांबी तितकीच अवलंबून असते. तुमचे खाणे, झाेपेच्या सवयी, मानसिक आराेग्य आणि राेजच्या आवडी-निवडी आयुष्य वाढवण्यासाठी फार महत्त्वाच्या असतात,’ डाॅ. ऋचा चतुर्वेदी.
डाॅ. चतुर्वेदी म्हणतात, ‘धूम्रपान टाळणे, नियमित व्यायाम, पुरेशी झाेप आणि मानसिक स्थैर्य टिकवणे, हे सर्व घटक तुमचे वय आणि आराेग्य नियंत्रित करण्यासाठी मदत करतात. चांगले मित्र असणे, कुटुंबाशी सुसंवाद, समाजाशी जुळलेले नाते, हे देखील आयुष्य वाढवण्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत. नवीन गाेष्टी शिकत राहणे आणि मेंदू सक्रिय ठेवणे, हे वृद्धापकाळात उपयुक्त ठरते.जरी तुमच्या कुटुंबात काेणी दीर्घ आयुष्य जगलेले नसले, तरी तुम्ही याेग्य जीवनशैलीनिवडल्यास, स्वतःचे आयुष्य वाढवू शकता.’ ‘सध्याच्या संशाेधनानुसार, आपल्या दैनंदिन सवयी आपल्या जनुकांची कामगिरी ठरवतात.त्यामुळे, आता आनुवंशिकतेपेक्षा आपल्या आवडी-निवडी अधिक प्रभावाने आपले आयुष्य ठरवू शकतात. शरीरातील हार्माेनसचे बॅलन्स, म्हणजे फक्त जिमला जाणे किंवा हिरव्या भाज्या खाणे एवढेच नसते. यात कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगचा नियमित व्यायाम, फायबर आणि फॅटयुक्त आहार, यांचाही समावेश हाेताे. चांगली झाेप आणि तणाव कमी करणाऱ्या सवयींमुळे हार्माेन्स नियंत्रणात राहतात,’ डाॅ. चतुर्वेदी.
डाॅ. चतुर्वेदी पुढे म्हणतात, ‘ब्लडमधली शुगर, काेलेस्टेराॅल आणि थायराॅईडसारख्या चाचण्या वेळेवर केल्यास पुढचे आजार टाळता येऊ शकतात. वृद्धांसाठी व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम पुरवणे देखील आवश्यक असते. छाेटीशी सवय जरी असली तरी आयुष्य वाढवण्यात ती माेठे काम करू शकते. शरीराचे खरे वय माेजण्यासाठी काही वैज्ञानिक चाचण्या आता उपलब्ध आहेत, ‘डीएनए मिथाइलेशन, टेलाेमेअर लेंग्थ आणि ब्लड मार्कर’, शरीराचे ‘खरे वय’ दर्शवू शकतात. हे वय तुमच्या केकवरच्या मेणबत्त्यांच्या संख्येपेक्षा वेगळे असते.’ ‘तुमचे बायाेलाॅजिकल वय, तुम्हाला हाेणारे आजार या अनेक घटकांवर अवलंबून असतात. त्यामुळे, तुम्ही या चाचण्यांचा मार्गदर्शनासाठी उपयाेग करा.वेळाेवेळी आराेग्य तपासण्या करणे व स्वतःची उत्तम प्रकारे काळजी घेणे, यावर तुमच्या वयाची लांबी ठरू शकते,’ डाॅ. ऋचा चतुर्वेदी