रत्न-दागिने उद्याेगासाठी नवीन उपक्रमांची घाेषणा

    01-Jul-2025
Total Views |
 


dagina
 
 
 
रत्नशास्त्र (हिरे/रत्नांची प्रतवारी आणि विश्लेषण, शिक्षण आणि संशाेधन), जेमाेलाॅजिकल इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिका ने भारतातील वेगाने वाढणारे हिरे आणि दागिन्यांच्या बाजारपेठेतील प्रचंड संधी लक्षात घेता, काही महत्त्वाच्या गाेष्टी जाहीर केल्या आहेत. यामध्ये व्यवसाय आणि ग्राहकांचा विश्वास वाढवण्यासाठी फिनिश्ड ज्वेलरी व रंगीत स्टाेन अहवाल लाँच केले आहेत.जीआयएचे अध्यक्ष आणि सीईओ सुसान जेम्स यांनी संस्थेची अखंडता आणि स्वातंत्र्याची प्रतिष्ठेचा पुनरुच्चार करीत सांगितले की, ‘जीआयए इंडिया’ हे भारतातील रत्ने आणि दागिन्यांच्या व्यवसायात ग्राहकांचा विश्वास राखण्याच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणार आहे.
 
‘जीआयए’ने प्रीतेश पटेल यांची नवीन अध्यक्ष आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली असून, 4 ऑगस्ट 2025पासून ते प्रभारी कार्यभार सांभाळतील.त्यांच्याकडे याबाबतचे धाेरण, नियाेजन, विकास आणि नवाेन्मेष उपायांच्या अंमलबजावणीची जबाबदारी राहील. पटेल त्यांच्या नवीन भूमिकेबद्दल यांचे अभिनंदन केले आहे. प्रीतेश पटेल यांनी त्यांच्या या नव्या जबाबदारीबद्दल सांगितले आहे, की ते ‘जीआयए’ला विश्वासार्ह पायावर उभे करण्यास ते वचनबद्ध आहेत.जीआयए पुढील महिन्यात भारतात किरकाेळ विक्री दागिन्यांच्या प्रतवारीच्या क्षेत्रात प्रवेश करण्याची घाेषणा करेन. यासह, ‘जीआयए’ त्याचा विस्तार करीत आहे.