समाजात मुलांनी कसे वागावे, मुलींनी कसे वागावे हे इत्नया न कळत्या वयात मनावर बिंबवले जाते, की हे असेच वागले पाहिजे, असे त्यांनाही वाटू लागते.आव्हानांचा सामना करण्याची स्वतःची स्वतंत्र नैसर्गिक पद्धत काेणतेही दुःख, वेदना, पीडा किंवा त्रास असेल, तर त्याविरुद्ध टिकून राहण्यासाठी प्रत्येक माणसाचे एक नैसर्गिक काेपिंग मॅकेनिझम असते. उदा. वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षक फार रागावले, त्यांनी पालकांना घेऊन यायला सांगितले, तर कदाचित पहिला विद्यार्थी रडू लागेल, दुसरा माफी मागेल, तिसरा स्वतः चा दाेष दुसऱ्यांच्या माथी मारेल, चाैथा काही समजून न घेता आरडा-ओरडा करेल आणि त्याचा काहीच दाेष नाही असं सांगू लागेल, पाचव्याला कशाचा काही फरकच पडणार नाही.सहावा कदाचित जास्त मस्तीखाेर असेल आणि जाेरजाेरात हसू लागेल, अशा प्रकारे जेवढ्या वेगवेगळ्या व्यक्ती, तितके वेगवेगळे दृष्टिकाेन असणार!
वास्तविक, त्यांचा हा दृष्टिकाेन हाच त्यांचा डिफेन्स मॅकेनिझम असताे. अशा प्रकारे, येणाऱ्या संकटापासून स्वतःला शारीरिक-मानसिकपणे कशा प्रकारे वाचवावे, याचा प्रत्येकाचा नैसर्गिक मार्ग असताे, पद्धत असते. ही रीत प्रत्येकाची स्वतःची, स्वतंत्र असते.
भावना व्य्नत न करण्याची शिकवण मुलांनी रडू नये, घाबरू नये आदी अनेक गाेष्टी मुलांच्या मनावर बिंबवल्या जातात.त्यामुळे पुरुष कितीही दुःख झाले तरी रडणे कमीपणाचे मानू लागतात. त्यामुळे त्यांचे दुःख बाहेर पडत नाही. मनात साठणाऱ्या यतणावाचे परिणाम शरीरावर दिसू लागतात.मुलांना त्यांच्या काेणत्याही भावना व्यक्तही करू दिल्या जात नाहीत. ज्यामुळे ते त्या व्यक्त करण्याचेच साेडून देतात. पुरुषांच्या या दुःखाला समजून घेतले पाहिजे.
पुरुष रागावताे वा माैन धारण करताे निसर्गाने अनेक डिफेन्स मॅकेनिझम दिले असले, तरी पुरुष मुख्यतः दाेनच प्रकारचे डिफेन्स मॅकेनिझम वापरताे. ताे एकतर रागावताे किंवा गप्प बसताे. जीवनात लहान-सहान तणाव निर्माण झाले, तर त्याविषयी पुरुष बाेलतच नाहीत. कारण या बाबतीत बाेलणे त्यांना क्षुल्लक वाटते. माेठ्या स्ट्रेसविषयी किंवा माेठ्या त्रासाविषयी बाेलत नाहीत, कारण आपल्या जवळच्या लाेकांना त्रास नकाे, असा विचार ते करतात.स्वसरंक्षणाच्या विविध पद्धती स्वतःचे रक्षण करण्यासाठी खाेटे बाेलणे, देखावा करणे, वाजवीपेक्षा अति बाेलणे किंवा अगदीच शांत हाेणे, रागावणे किंवा फार हसणे, रडणे, शांत बसणे या सर्व प्रतिक्रिया डिफेन्स मॅकेनिझमच्या वेगवेगळ्या पद्धती असतात.पुरुष बाेलतात कमी ही गाेष्ट तर स्पष्टच आहे, की स्त्रियांच्या तुलनेत पुरुष भावना व्यक्त करत नाहीत किंवा करत असतील तर त्याचे प्रमाण फारच कमी आहे.
याविषयी मानसाेपचारतज्ज्ञ नरेंद्र किंगर यांनी सांगितले, की बायाेलाॅजिकली सुद्धा मुलींपेक्षा मुले कमी एक्स्प्रेसिव्ह असतात.पुरुषांच्या मेंदूचा ताे भाग महिलांच्या तुलनेत उशिरा विकसित हाेताे. म्हणूनच मुलगा, मुलीपेक्षा उशिरा बाेलायला शिकताे. एका अभ्यासानुसार, एक पुरुष संपूर्ण दिवसात 7,000-12,000 शब्द उच्चारताे. तर, एक स्त्री 7000 ते 30,000 शब्द बाेलते. भाषा हे अभिव्यक्तीचे मुख्य माध्यम आहे! पुरुषांसाठी रडणेही आवश्यक मनात दडवलेल्या भावनांचा पुरुषांवरही परिणाम हाेत असताे. पण पुरुषांना कुणी रडूच देत नाही! जर कुणी पुरुष रडू लागला, तर त्याला लगेचच शांत बसायला सांगितले जाते, पण हे अत्यंत चुकीचे आहे. जर माणूस आपले हास्य लपवत नाही, तर अश्रू लपवण्याची काय गरज आहे?सामाजिक कारणे दुसरं कारण म्हणजे साेशल कंडिशनिंग.
समाजाने पुरुषांना याच प्रकारे जगायला शिकवले आहे. याविषयी मानसाेपचारतज्ज्ञ डाॅ. श्याम मिथिया यांनी सांगितले, की लहानपणापासून मुलगा रडू लागल्यावर, लगेचच म्हटले जाते की, मुलीसारखा का रडताेस? मन हलके करण्यासाठी बाेलू लागला तर म्हणतात, की मुलीसारखा काय बडबड करताेस? ताे हरला आणि त्याचा त्याला संकाेच वाटू लागला, तर म्हणतात की तू बायकी आहेस का? नवी गाेष्ट शिकताना जर त्याला भीती वाटू लागली तर म्हणतील की तू डरपाेक, भित्रा आहेस का? फार प्रेम वाटू लागले आणि मम्मी किंवा पप्पाच्या गळ्यात पडला, तर म्हणतील की काय सारखा गळ्यात पडताेस? अशा प्रकारे मुलाला लहानपणापासूनच त्याची काेणतीही भावना व्यक्त करू दिली जात नाही. ताे ती व्यक्त करू लागला, की त्याला घालून-पाडून बाेलण्यात येते. याचा परिणाम म्हणून ताे भावनाच व्यक्त करण्यास संकाेच करू लागताे! दाटलेल्या भावनांनी हाेते नुकसान भावना व्यक्त न करण्याच्या सवयीने पुरुषांचे फारच नुकसान हाेते, असे डाॅ. श्याम मिथिया यांनी सांगितले.
वेळेत भावना व्यक्त न झाल्याने, आतमध्ये साठून राहतात. पण, काही काळानंतर भावनांचा विस्फाेट हाेताे.त्या रागाच्या स्वरूपात बाहेर पडतात. काेणताही पुरुष जेव्हा तणावात येताे, तेव्हा ताे आरडा-ओरडा करताे, रागावताे, डाेळे लाल करताे. तेव्हा आपल्याला एवढे विचित्र वाटत नाही. पुरुष आहे तर रागवणारच, हे आपल्याला अगदी साहजिक वाटते.भावनांचा उद्रेक झाल्याने बिघडते आराेग्य, नातेसंबंध खूप काळ गप्प राहून किंवा खूप राग व्यक्त करूनही पुरुषांचेच नुकसान हाेते. याविषयी नरेंद्र किंगर यांनी सांगितले, की त्यामुळे पुरुषांचे मानसिक, शारीरिक आराेग्य बिघडते. ते बाेलत नाहीत म्हणून लाेक त्यांना समजून घेत नाहीत.लाेकांचा त्यांच्या बाबतीत गैरसमज हाेताे. त्यातून इतरांच्या संबंधावर परिणाम हाेताे. जेव्हा राग व्यक्त हाेताे, तेव्हा त्यांच्या जवळच्या संबंधावर याचा खाेलवर परिणाम हाेताे! अडचणीही लपवतात पुरुष अशाच प्रकारे पुरुष त्यांच्या अडचणी कधीच सांगत नाहीत. हेही आपल्याला नाॅर्मल वाटते; पण हे नाॅर्मल नाही!
भावनांना दडपून (सप्रेस करणे) ठेवल्याने, त्या रागाच्या रुपातून बाहेर पडतात. राग येणे हे पाॅवरचे नाही तर लाचारीचे प्रतीक आहे! रागामुळे हाेईल नुकसान बरेच लाेक म्हणतात, की कामाच्या जागेवर रागवले नाही तर कुणी ऐकणार नाही, असे अनेकांना वाटते. अनेक बाॅस इतरांकडून काम करवून घेण्यासाठी रागाचा हत्यार म्हणून वापर करतात. या गाेष्टीची गंभीरता समजावताना डाॅ. श्याम मिथिया म्हणतात, जेव्हा तुम्ही समजता, की स्टाफला रागावल्याशिवाय ते काम करत नाहीत, तेव्हा तुम्ही तुमच्या विकनेसला लपवण्याचा बहाणा शाेधत असता. काम न करणाऱ्या व्यक्तीस वाॅर्निंग द्या. तरीही करत नसेल, तर पगार कापा.म्हणजे ती नक्की काम करू लागेल. त्यासाठी तुम्हाला रागवण्याची गरज नाही. जी व्यक्ती कामात चिडचिड करते ती तिच्या खासगी जीवनातही करते. कारण आतापर्यंत पुरुषांना केवळ राग व्यक्त करायलाच शिकवले गेले आहे.
पण, आता ही परिस्थिती बदलण्याची आवश्यकता आहे! पुरुषांनीही शिकावे व्य्नत व्हायला अनेक पुरुषांनाही व्यक्त व्हायचे असते.त्यांना केवळ राग व्यक्त करायचा नसताे, तर भीती, आनंद आदी इतर भावनाही व्यक्त करायच्या असतात. पण, लहानपणापासून शिकलेले डिफेन्स मॅकेनिझम कसे बदलावे हा प्रश्न आहे. याविषयी नरेंद्र किंगर यांनी सांगितले, की आपल्या समाजात पुरुषांना कुणी फारसे बाेलू दिले जात नाही.काउन्सेलिंगसाठी येणाऱ्या कपल्समध्येही हेच दिसते. त्यामुळे पुरुषांनाही बाेलू दिले पाहिजे. त्यांच्या भावनांना वाट माेकळी करून दिली पाहिजे. काेणतीही व्यक्ती विश्वासाने तेव्हाच बाेलू शकते जेव्हा समाेरची व्यक्ती तिला जज केल्याशिवाय ऐकेल. म्हणजे विश्वासाचे वातावरण निर्माण केले पाहिजे. महिलांना अनेक मैत्रिणी असतात. त्या एकमेकींशी खूप बाेलतात.ऐकून घेतात. तसेच, आता पुरुषांनीही बाेलले पाहिजे. मन माेकळे केले पाहिजे.