शिक्षणात नियाेजन, सातत्यावर यश अवलंबून : ठाकूर

01 Jul 2025 22:42:06
 

School 
 
भारत आज जागतिक पातळीवर ‘राेल माॅडेल’ म्हणून उभा आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे जग भारताकडे सामर्थ्य असलेला देश म्हणून पाहते आहे. काेणताही विकसित देश ज्या ठिकाणी पाेहाेचलेला नाही, तेथे आज भारत आपले नेतृत्व दाखवत आहे. टॅलेंटपेक्षा स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगला प्राधान्य दिल्यामुळे या गाेष्टी शक्य हाेतात. युद्धाप्रमाणेच शिक्षणातही यश फक्त गुणांवर नव्हे, तर याेग्य नियाेजन, सातत्य आणि काैशल्य विकासावर अवलंबून आहे, असे मत अ‍ॅम्युनेशन फॅक्टरी खडकीचे मुख्य महाव्यवस्थापक अरुण ठाकूर यांनी व्यक्त केले.श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने जय गणेश विद्यार्थी पालकत्व याेजनेत दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचे आयाेजन स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हाॅलमध्ये करण्यात आले हाेते.
 
यावेळी महिला कल्याण संघाच्या अध्यक्ष डाॅ. वैशाली ठाकूर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, काेषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमाेल केदारी, डाॅ. अ. ल. देशमुख, संस्कार वर्ग प्रमुख विजय भालेराव, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी, अतुल चव्हाण, राजाभाऊ घाेडके, विश्वास पलुसकर, माऊली रासने, सुवर्णयुग सहकारी बँकेचे संचालक राजाभाऊ पायमाेडे, अण्णा रासकर, राजू वाईकर आदी यावेळी उपस्थित हाेते.काैशल्य विकास आधारित आणि राेजगाराभिमुख असे सुमारे 25 ते 30 काेर्स दगडूशेठ ट्रस्ट आणि विविध संस्थांच्या विद्यमाने सुरू आहेत. या माध्यमातून टेक महिंद्रा आणि टाटा ड्राईव्हसारख्या नामवंत संस्था दगडूशेठ ट्रस्टबराेबर जाेडल्या गेल्या आहेत. आतापर्यंत सुमारे 850 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या काेर्सचा लाभ घेतला आहे.
 
पालकत्व याेजनेतून आत्तापर्यंत जवळपास 250 विद्यार्थी पास आऊट झाले असून, आपापल्या क्षेत्रात उत्तम राेजगार मिळवत आहेत. त्यात पीएचडीला 1 विद्यार्थी असून, 42 विद्यार्थी इंजिनीअर झाले आहेत. बरेच विद्यार्थी उच्चशिक्षित असून, जवळपास 100 विद्यार्थी पदवीधर झाले आहेत.दगडूशेठ ट्रस्टने माझ्या शैक्षणिक वाटचालीत मदतीचा हात दिल्यामुळे आज मी शास्त्रज्ञ हाेण्यापर्यंतचा टप्पा गाठू शकलाे. मुलींच्या शिक्षणासाठी माझे वडील 3 बाय 3 च्या खाेलीत पुण्यात झाेपडपट्टीत राहिले. शालेय शिक्षणानंतर गरवारे महाविद्यालयातून मी बीएससी आणि एमएससी करून फिजिक्स शिकण्याची भूक भागवली. प्रधानमंत्री रिसर्च फेलाेशिपसाठी माझी निवड झाली आणि मला ती मिळाली आहे.
 
यामागे जय गणेश याेजनेचा वाटा माेठा असून त्याचे आम्ही भाग आहाेत. ट्रस्टने त्यांच्या तिजाेरीची दारे गाेरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी उघडी केली आहे. त्यामुळे याचा लाभ आजही माझ्यासारख्या अनेकांना मिळत आहे, असे या याेजनेतील माजी विद्यार्थी समाधान कांबळे याने सांगितले.या याेजनेतील दहावीतील सेजल धावडे या विद्यार्थिनीने 92 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. तिच्या या यशात ट्रस्टचा खूप माेठा वाटा आहे, असे तिने सांगितले. आर्किटेक्ट हाेण्याचे तिचे ध्येय आहे. बारावीतील प्रज्वल केदारी 82 टक्के गुण मिळवून याेजनेत प्रथम आला. ट्रस्टचा माेलाचा मदतीचा हात मिळाला, राहण्याची साेय झाली. मी शिक्षण पूर्ण करून इंजिनीअर हाेऊन याेजनेतील पुढील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार, असे त्याने सांगितले डाॅ. देशमुख, सूर्यवंशी यांनी मनाेगत व्यक्त केले.
Powered By Sangraha 9.0