शाॅर्टकट साेल्युशनवर भर : सध्याच्या जगात लहानांपासून ते माेठ्या माणसांपर्यंत अनेकांना झाेपेच्या समस्या भेडसावत आहेत. शांत झाेप यावी, यासाठी तज्ज्ञ विविध मते मांडत आहेत. पण, लाेकांना कमी काळात जास्त परिणाम हवा असल्याने शाॅर्टकट साेल्युशनवर जास्त भर दिला जाताे. त्यामुळे स्लीप गमीज गाेळ्यांचा आसरा घेण्याचे प्रमाण वाढले आहे.
वेगाने वाढतेयं मागणी : फ्युचर मार्केटने नुकतीच एक पाहणी केली. त्यात दिसून आले की, वर्षामध्ये अंदाजे साडे सात टक्के विकास दराने या मार्केटचा विकास हाेत आहे.
काय आहे स्लिप गमीज : स्लिप गमीज या गाेळ्या जेलीसारख्या दिसतात. त्या खाल्यावर 30 मिनिटांमध्ये झाेप लागते, असा दावा औषध निर्माते करतात. या गाेळ्यांमध्ये मेलाटाेनिन, एल-थियानिन, कॅमाेमाइल आणि टार्ट चेरी अर्क सारखे घटक असतात, ते झाेपजागरणाच्या चक्रांचे नियमन करण्यास, चिंता कमी करण्यास आणि स्नायूंना आराम देण्यास मदत करतात, असा दावा केला जाताे.
बदलत्या जीवनशैलीने झाेपेवर केला परिणाम : आपली जीवनशैली बदलली. स्क्रीन-टाइम वाढला.कॅफीनयुक्त आहार वाढला आणि झाेप घटली. या बदलत्या जीवनशैलीचे आराेग्यावरील दुष्परिणाम दिसलागले आहे. त्यामध्ये झाेप कमी हाेणे, न येणे हा माेठा दुष्परिणाम पुढे आला आहे.
मेलाटाेनीनची झाेपेसाठी आवश्यकता : मानवी शरीराचे काम नैसर्गिक चक्रावर चालू आहे. त्याला शरीरातंर्गत घड्याळही म्हणता येईल. या लयीवर आपली भूक, झाेप आदी गाेष्टी ठरतात. त्याला सर्केडियन लय म्हणतात.ही लय नियंत्रित करण्याचे काम मेलाटाेनिन हे नैसर्गिक हार्माेन करते. हे हार्माेन झाेपेसाठी आवश्यक आहे. कारण ते आपल्याला झाेपायला आणि झाेपेत राहण्यास मदत करते. तसेच झाेपण्याची वेळ आणि जागण्याची वेळ निश्चित करते.