वैनगंगा काेरंबी प्रकल्पाची शिंदे यांच्याकडून पाहणी

01 Jul 2025 22:45:21
 

CM 
 
भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा काेरंबी येथील जलपर्यटन प्रकल्पाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार नरेंद्र भाैंडेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव, पाेलीस अधीक्षक नुरुल हसन, निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके, अधीक्षक अभियंता राजेश पाटील, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण उपस्थित हाेते. जिल्ह्यातील काेरंबी गावाजवळ वैनगंगा नदीवर प्रस्तावित जलपर्यटन प्रकल्पाचे काम सुरू असून, या कामाला शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी भाैंडेकर यांनी या प्रकल्पाविषयी माहिती दिली. विदर्भात जलपर्यटनाला वाव असून, या प्रकल्पाचे काम दर्जेदार व्हावे, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. त्यानंतर भंडारा शहरातील खांब तलाव परिसरातील भव्य प्रभु श्रीराम मूर्तीचे शिंदे यांनी दर्शन घेतले. साेबतच परिसरातील कामांची पाहणी केली.
 
Powered By Sangraha 9.0