जाेडीदारामध्ये विश्वास आणि समजूतदारपणा असावा

    09-Jun-2025
Total Views |
 

thoughts 
 
त्यांची आठवण ठेवा : कधी कधी लहान-लहान बाबींचाही माेठा परिणाम हाेताे. जेव्हा तुम्ही ऑफिसात असाल, तेव्हा आपल्या माेबाइलमधून आपल्या पतीच्या माेबाइलवर लहानसा एसएमएस करा की, तुम्हाला त्यांची आठवण येत आहे. अशा प्रकारचा प्रेमाचा संदेश जादू करील. ही गाेष्ट काेणीही समजू शकताे की, ऑफिसातील व्यस्त क्षणांमध्येही काेणाला आपल्या साथीची आठवण आली नाही. पण तरीही असा एसएमएस निश्चितच परिणाम दाखविताे. किंवा कधी कधी एका लहानशा कागदावर प्रेम संदेश लिहून साेडा. याचाही खूप चांगला परिणाम हाेईल.
 
फिरायला जा : पण केवळ तुम्ही दाेघेच, आणखी काेणी नाही. जर तुम्ही एकत्र कुटुंबात राहात असाल, तर हे थाेडे साेपे हाेईल. कारण तुम्ही आपल्या मुलांना घरीच सुलभतेने साेडून जाऊ शकता. नाहीतर जेव्हा तुमची मुले सुट्ट्यांमध्ये कुठे गेली असतील, तर असा कार्यक्रम बनवू शकता.पण या पिकनिकला तुम्ही आपल्या दाेघांपुरतेच मर्यादित ठेवा आणि प्रेमाचा भरपूर आनंद घ्या. एकमेकांना वेळ देण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.तुम्ही संध्याकाळी ऑफिसमधून परतल्यानंतर थाेडे दूर फिरायला जाऊ शकता.त्यामुळे आराेग्यही चांगले राहील आणि तुम्ही दाेघे परस्परांमध्ये संवाद साधू शकाल.
 
भेटींची भूमिका : हे आवश्यक नाही की, भेटी महागच असाव्यात. एकचाॅकलेट सुद्धा आपली कमाल दाखवू शकते. पण या लहान लहान भेटींनी काही क्षण अतिशय आनंदी हाेतात. हे सर्वांत आवश्यक आहे. तुम्हा दाेघांमध्ये जर उत्कृष्ट समन्वय असेल, तर तुमच्या जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदी हाेईल.कारण दाेघांनाही एकमेकांचा कमकुवतपणा आणि बलस्थान यांची माहिती असते.परस्परांमधील समजुतीला नवीन उंचीपर्यंत घेऊन जा. एकमेकांमधील संकाेच दूर करा. मग ताे काेणत्याही बाबतीतील असला तरी. पती-पत्नीपेक्षा जास्त चांगले मित्र मिळणे अवघड आहे. अशा वेळी एक दुसऱ्याविषयी विश्वास आणि परस्परांमधील समजूतदारपणा अतिशय आवश्यक आहे.