जर पाहुणा बनून एखाद्या मित्र वा नातलगाच्या घरी जावे लागेल तर काही गाेष्टी लक्षज्ञत ठेवल्यास यजमानाला आपले येणे खटकणार नाही उलट ताे आनंदी हाेईल. जाणून घेऊ या उत्तम पाहुणा हाेण्याची तत्त्वे पूर्वसूचना : एखाद्या कामासाठी दुसऱ्या शहरात जावे लागत असेल व एखाद्या नातेवाईकाकडे राहण्याचे ठरवत असाल तर यजमानाला आपण येत असल्याची पूर्वसूचना द्यावी व बाेलता बाेलता ताे कामात तर नाही ना हेही जाणून घ्यावे. कधीही पाहुणा बनून ‘सरप्राइज’ देऊ नये. समाेरच्याचा स्वत:चा एखादा प्लॅन असू शकताे. अशावेळी आपले हे सरप्राइज यजमानाला खूश करणार नाही.
साधनव्यवस्था : यजमानाच्या शहरात पाेहाेचताच त्याला आपल्याला नेण्यासाठी एअरपाेर्ट, स्टेशन वा बसस्टँडपर्यंत गाडी घेऊनयेण्यास सांगू नये. स्वत: आपली साेय करीत पाेहाेचावे. परतीतही आपल्या व्यवस्थेने परतावे जररसमाेरचा व्यस्त नसेल तर ताे आपल्याला नेण्यासाठी व साेडण्यासाठी येऊ शकताे, पण जर हे श्नय नसेल तर अपेक्षा बाळगू नये.
वाहनाचा वापर : आपल्याला शहरात नवे सांगून अनावश्यक रुपात यजमानाला प्रत्येक ठिकाणी साेबत चलण्याचा आग्रह करू नये, तसेच त्याचे वाहन इ.ही वापरू नये. आजकाल ऑनलाइन रिक्षज्ञ वा टॅ्नसी खूप सहजतेने मिळतात. प्रयत्न करा की आपल्यामुहै यजमानाला त्याच्या ऑफिसमधून सुटी घ्यावी लागणार नाही.
फर्मायशी करू नये : सकाळी उठल्यानंतर श्नय असेल तर स्वत:साठी चहा-काॅफी स्वत: बनवून घ्यावी. नाश्ता व जेवण बनवण्यातही मदत करावी. यामुळे आपले येणे समाेरच्यालाखटकणार नाही. खाण्या-पिण्याबाबत जास्त नखरे करू नये तसेच आपल्या मुलांनाही करू देऊ नयेत. जेवणानंतर गाेड खाण्याची सवय असेल तर वायफळ फर्माइश करून समाेरच्यासाठी अडचणी उत्पन्न करू नयेत.
सामंजस्य राखा : काहीजणांना रात्री उशीरपर्यंत टीव्ही पाहण्याची वा माेबाइल पाहण्याची सवय असते. दिवसभर टीव्हीचा रिमाेट घेऊन आपले मनपसंत चॅनल पाहतात. असे करू नये. इतरांच्या पसंतीचाही विचार करावा.कित्येकदा तर लाेक टीव्ही पाहता पाहता फाेन चालवू लागतात वा फाेन आल्यानंतर टीव्ही, पंखा चालू ठेवून बाहेर जातात. असे करणे चुकीचे आहे. लाइट, पंखे, टीव्ही, गीझर, ए्सी इ. चालू ठेवून जाऊ नये. बाथरूम इ.चा व्यवस्थित वापर करावा. बाथरूमसंबंधित सर्व कामे सकाळी लवकर उठून उरकावीत. जेणेकरून घरातील इतरांना समस्या हाेणार नाही.
कामाशी काम ठेवावे : काहीजणांना आपुलकी जाहीर करण्यासाठी खाजगी गाेष्टी सांगू लागतात व समाेरची व्यक्तीही आपल्या वैयक्तिक गाेष्टी सांगू लागते. यजमानाच्या वैयक्तिक व काैटुंबिक गाेष्टीत नाकही खुपसू नये व सल्लाही देऊ नये. कदाचित समाेरच्याला हे आवडणारही नाही.यासाठी साध्या गप्पा माराव्यात. बळेच खाजगी गाेष्टी जाणण्यचा प्रयत्न करू नये.