आय मेकअप तुमच्या चेहऱ्याचे साैंदर्य वाढविते ही गाेष्ट खरी आहे. परंतु, ज्या युवती रेग्युलर रुटीनमध्ये कमीत-कमी मेकअप करण्याचे पसंत करतात किंवा ज्यांचे डाेळे मूळचेच सुंदर असतात त्यांना आय मेकअप लावण्याची आवश्यकता नसते; फ्नत आयलायनर, काजळ आणि मस्कारानेसुद्धा डाेळ्यांना जास्त आकर्षक करता येते. सध्या काजळ आणि आयलायनरप्रमाणे मस्काऱ्याचा वापरसुद्धा वाढला आहे. ताे डाेळ्यांना सुंदर बनविताे ही गाेष्ट अगदी खरी; पण दरराेज ताे अप्लाय केल्याने डाेळ्यांना नुकसान हाेऊ शकते.
डाेळ्यांमध्ये जळजळ : मस्काऱ्यामध्ये अशी केमिकल्स असतात, जी डाेळ्यांसाठी हानिकारक आहेत. त्यांच्या जास्तीच्या वापराने डाेळ्यांमध्ये जळजळ किंवा खाज हाेण्याची समस्या उद्भवू शकते. बरेचदाडाेळे लाल हाेणे आणि डाेळ्यांतून पाणी येण्याची समस्याही येते.
पापण्यांचे केस गळणे : जर तुम्ही दरराेज मस्कारा लावत असाल आणि रात्री ताे न काढताच झाेपत असाल, तर डाेळ्यांच्या पापण्या कमजाेर बनतात आणि त्या गळण्यास सुरुवात हाेते. एवढेच नव्हे, तर पापण्यांचा दाटपणा (थिकनेस) सुद्धा कमी व्हायला लागताे.
म्हणून झाेपण्याआधी मस्काऱ्याला बेबी ऑईलच्या मदतीने काढून टाकावे, ज्यामुळे तुमचे डाेळे रिलॅक्स फील करतील.
अॅलर्जीचा धाेका : मस्काऱ्यामध्ये प्रिझर्वेटिव्हज आणि इतर केमिकल्सचा वापर हाेत असताे, जाे डाेळ्यांसंबंधित अॅलर्जीचे कारण बनत असते.या व्यतिरिक्त, जर मस्काऱ्याचा ब्रश एकापेक्षा अधिक व्यक्ती वापरत असतील,तर ते सुध्दा इन्फेक्शनचे कारण बनते. बरेचदा मस्कारा लावताना ताे डाेळ्यांमध्ये गेल्यास काॅर्नियाला नुकसान पाेचवताे, ज्यामुळे दृष्टी कमजाेर हाेऊ शकते.
एवढे लक्षात ठेवा :
नेहमी ब्रँडेड मस्कारा खरेदी करावा, कारण मार्केटमध्ये स्वस्तात मिळणाऱ्या मस्काऱ्यांमध्ये केमिकल्सचे प्रमाण जास्त असते.
जर मस्कारा खूप दिवसांपासून घरात पडून असेल, तर ताे वापरण्याऐवजी डिस्कार्ड करावा आणि एक्स्पायरी डेट चेक करावी.
रात्री झाेपण्याआधी फेस वाॅश करून झाेपावे आणि मस्कारा पापण्यांमधून नीट निघाला आहे किंवा नाही याची काळजी घ्यावी.
मस्कारा स्वतःचाच वापरावा. दुसऱ्यांचा वापराल तर इन्फेक्शन हाेण्याचा धाेका वाढेल.