भारत-जपानमधील सहकार्य वाढवू: पवार

    06-Jun-2025
Total Views |
 

CM 
 
‘भारतात जपानने माेठी औद्याेगिक गुंतवणूक केली असून, महाराष्ट्रात तीनशेहून अधिक, तर पुणे आणि परिसरात पन्नास कंपन्या कार्यरत आहेत. राज्याच्या औद्याेगिक, आर्थिक, सामाजिक प्रगतीत, राेजगारनिर्मितीत माेलाचे याेगदान देणाऱ्या या कंपन्यांच्या समस्यांचे निराकरण करून त्यांच्यासाठी उद्याेगपूरक वातावरण निर्माण करणे ही शासनाची जबाबदारी आहे.यापुढील काळात उद्याेग, आर्थिक क्षेत्रातील सहकार्यासाेबतच सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही भारत आणि जपानमधील सहकार्य वाढवण्यासाठी प्रयत्न करू या,’ असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत यागी काेजी यांच्या भेटीदरम्यान केले.
यागी काेजी यांनी पवार यांची सह्याद्री अतिथिगृहात सदिच्छा भेट घेतली.
 
यावेळी जपान राज्यात गुंतवणूक वाढवण्यासह उद्याेग क्षेत्रासमाेरील अडचणी दूर करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. उद्याेग, आर्थिक क्षेत्रांबराेबरच दाेन्ही सामाजिक, सांस्कृतिक सहकार्य वाढवण्यावरही चर्चेत भर देण्यात आला. राज्याच्या नियाेजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयु्नत डाॅ.राजगाेपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डाॅ. राजेश देशमुख उपस्थित हाेते.पुण्यातील जपानी कंपन्यांना पायाभूत सुविधांबराेबरच रस्ते, वीज, पाणी, दळणवळणासंदर्भातील प्रश्न तातडीने साेडवण्यात येतील. जपानी कंपन्यांच्या प्रश्नांसंदर्भात जपानी कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमाेवत पुण्यात बैठक घेण्यात येईल. धाेरणात्मक आणि करासंदर्भातील प्रश्नही साेडवले जातील, अशी ग्वाही पवार यांनी दिली. यावेळी मियावाकी उद्याने, सामाजिक उत्तरदायित्व निधी, जायका, एसटीपी, पूरनियंत्रण अशा विविध प्रश्नांवरही उभयतांत चर्चा झाली.