गाेष्ट गेल्या वर्षातील आहे. माझी मुलगी आणि नात मुंबईहून जळगावला माझ्याकडे आली हाेती. नात श्रुतीचा ऑनलाइन अभ्यास चालू हाेता. ्नलास झाल्यानंतर ती आपल्या रजिस्टरमध्ये असाइनमेंट लिहीत हाेती, जी तिला जमा करावयाची हाेती. एक दिवस मी डायनिंग टेबलावर ठेवलेले तिचे रजिस्टर व्यवस्थित ठेवत हाेते तेव्हा ते उघडून पाहावेसे वाटले. जेव्हा मी दाेन रजिस्टर उघडली, तेव्हा आश्चर्य वाटले की, दाेन्हीत एकसारखेच काम केलेले हाेते. जेव्हा श्रुती आली, तेव्हा मी तिला त्याविषयी विचारले. ती म्हणाली, ‘अगं आजी, एक रजिस्टर माझ्या मैत्रिणीचे आहे. मी तिला मदत करते आहे.’ माझ्या ताेंंडून निघून गेले, ‘घरना पाेर उघडा न् व्याहीनले नेसाना लुगडा.’ तिने ते ऐकताच ती म्हणाली, ‘काय म्हणालीस आजी, पुन्हा बाेल.’ मी पुन्हा म्हणाले. ती विचारू लागली, ‘याचा काय अर्थ आहे नानी?’ मी म्हणाले, ‘याचा अर्थ आहे आपला मुलगा तर उघडा बसला आहे आणि आपण व्याहिनीला लुगडं नेसायला देत आहाेत.
तीच गाेष्ट आहे ते तुझे स्वत:चे काम पूर्ण हाेत नाही आणि प्रथम दुसऱ्याचे करीत आहे. प्रथम स्वत:चे काम पूर्ण कर. तिला तिचे काम करू दे.’ श्रुती टाळ्या वाजवू लागली व म्हणाली ‘वा आजी! काय मजेशीर म्हण जाेडली आहेस तू!’ काही दिवसांनंतर आमच्याकडे दुपारच्या जेवणासाठी पाहुणे येणार हाेते.आमच्याकडे काम करणारी रीना आली व म्हणाली, ‘आजी मी समाेरच्या घरात काम करायला जायचे आहे. त्यामुळे मी लवकर जाते.’ दुपारी पाहुणे जेवायला येणार आहेत, हे माझ्या लक्षात राहिले नव्हते आणि मी सांगून टाकले की, ठीक आहे. ती निघून गेली तेव्हा श्रुतीने माझी म्हण माझ्यावरच वापरली. म्हणू लागली, ‘आजी, आपले सारे काम पडले आहे आणि तू रीनाताईला आधीच दुसऱ्याच्या घरात पाठवून दिले. हे तर तेच झाले ना ‘घरना पाेर उघडा न् व्याहिनले नेसाना लुगडा’ तिच्या ताेंडून ते ऐकल्यानंतर घरातील सारे खळखळून हसू लागले.